Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव जाणून घ्या एका निडर संन्याशाची प्रेरणादायी जीवनकथा, त्यांचे शक्तिशाली विचार, शिकवणी आणि भारताच्या नवजागरणावर झालेला सकारात्मक प्रभाव.

ज्या व्यक्तीच्या आवाजाने जग बदलून गेलं “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” — हा ऊर्जादायी संदेश देणारा तरुण संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद. भारताच्या अध्यात्माला जागतिक पातळीवर नेणारा, युवकांना धैर्य देणारा आणि स्वाभिमान शिकवणारा असा हटके व्यक्तिमत्वाचा संन्यासी इतिहासात क्वचितच दिसतो.

Table of Contents

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

आरंभ – नरेंद्र ते विवेकानंद

12 जानेवारी 1863 रोजी कोलकत्ता येथे जन्मलेले नरेंद्रनाथ दत्त बालपणापासूनच शोधक वृत्तीचे, अतिशय बुद्धिमान आणि प्रश्न विचारणारे होते. त्यांच्या मनात देव म्हणजे काय? सत्य कोणते? जीवनाचे उद्दिष्ट काय? असे प्रश्न नेहमीच होते. त्यांची ही धडपड त्यांना एका दिव्य व्यक्तीकडे घेऊन गेली – श्रीरामकृष्ण परमहंस.

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

स्वामी विवेकानंद शैक्षणिक जीवन

वयाच्या आठव्या वर्षी स्वामी विवेकानंद ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. त्यांचे कुटुंब 1877 मध्ये रायपूरला स्थलांतरित होणार होते तोपर्यंत त्यांनी त्या शाळेत शिक्षण घेतले. प्रेसिडेन्सी कॉलेज प्रवेश परीक्षेत 1879 मध्ये प्रथम श्रेणीचे गुण मिळवणारे स्वामी विवेकानंद हे एकमेव विद्यार्थी होते.

जनरल असेंबलीच्या संस्थेत स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपियन इतिहास यांचा अभ्यास केला. 1881 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी ललित कला परीक्षा उत्तीर्ण केली आणि 1884 मध्ये त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली.

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

गुरु-शिष्य नाते – अध्यात्माचा प्रकाश

श्रीरामकृष्णांनी नरेंद्रच्या डोळ्यांतलं तेज ओळखलं. त्यांनी फक्त अध्यात्म शिकवलं नाही, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे महान तत्त्वही दिलं. या शिकवणीमुळे नरेंद्राचं अंतर्मन बदलून गेलं आणि त्यांनी संन्यास स्वीकारायचं ठरवलं आणि सर्वांना आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचं ठरवलं.

शिकागोचे ऐतिहासिक सभागृह – जगाने ऐकलेला भारतीय गर्जना

1893 मध्ये शिकागो येथील “Parliament of World Religions” मध्ये विवेकानंदांनी दिलेलं प्रसिद्ध भाषण आजही जगाला प्रेरित करतं. त्यांचे सुरुवातीचे शब्द –“Sisters and Brothers of America…”या एका वाक्यातून त्यांनी जगाला भारतीय संस्कृतीतील प्रेम, समता आणि स्वीकार यांचे दर्शन घडवले. सभागृहातील प्रेक्षक काही मिनिटे उभे राहून त्यांचे स्वागत करत राहिले, टाळ्यांचा नुसता गडगडाट – हा प्रसंग इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला.

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

भारतभक्ती – तरुणांना दिलेली ऊर्जादायी हाक

स्वामी विवेकानंद यांनी भारतातील युवकांना दिलेला संदेश आजही तितकाच सामर्थ्यवान वाटतो.

तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा.

शक्ती हेच जीवन आहे; दुर्बलता म्हणजे मृत्यू.

शिक्षण म्हणजे मनुष्याच्या आत दडलेल्या सामर्थ्याचा विकास.

त्यांचा प्रत्येक संदेश आत्मविश्वासाने भरलेला आणि जागृत करणारा होता.

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

मानवसेवेचा मार्ग – रामकृष्ण मिशनची स्थापना

1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. या संस्थेचे ध्येय स्पष्ट होते –शिक्षण, आरोग्य सेवा, आपत्तीग्रस्तांना मदत आणि समाज uplift करणे. आजही लाखो लोकांना ही संस्था उभं राहण्यासाठी मदत करते.

Motivational Stories

विचारांची क्रांती – आधुनिक भारताच्या घडणीत भूमिका

स्वामी विवेकानंदांचा भारतीय समाजावर खोलवर प्रभाव पडला.त्यांनी भारतीयांना स्वतःच्या संस्कृतीवर अभिमान बाळगायला शिकवलं. त्यांच्या विचारांची झेप –

आध्यात्म

शिक्षण

स्त्री-शिक्षण

शक्तिवाद

राष्ट्रभक्ती

या सर्व क्षेत्रांत दिसून येते. त्यांनी सांगितलेलं एक महत्त्वाचं वाक्य आजही युवकांच्या मनाला भिडतं —“कणा ताठ ठेवून उभं राहा, जग तुमचे स्वागत करेल.”

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

शिकवण

स्वामी विवेकानंद आपल्याला काय शिकवतात?

आत्मविश्वास हीच खरी शक्ती

प्रयत्न आणि चिकाटीने अशक्यही शक्य होतं.

मानवसेवा म्हणजेच ईश्वरसेवा

शिक्षण हे समाजाची खरी उभारणी

• स्वतःशी प्रामाणिक राहा आणि ध्येय ठरवा.

निष्कर्ष – व्यक्तिमत्व जे अमर राहणारच

स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेला प्रकाश आजही तितकाच तेजस्वी आहे. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले आणि पुढील पिढ्यांना ऊर्जा देत राहतील. ते फक्त संन्यासी नव्हते…ते भारताचा आत्मविश्वास होते.

Watch More On

Swami Vivekananda : The Inspiring Journey of a Fearless Monk | स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी जीवनकथा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव

विचारधन – स्वामी विवेकानंद

खुळचट समजूत व अंधविश्वास मनुष्याचा शत्रू खराच, पण संकुचितपणा त्याहीपेक्षा भयंकर शत्रू होय.

माता-पिता, पुत्र, पत्नी, बंधू, अतिथी प्रभुतींच्या अत्रवस्त्राची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःचेच उदरभरण करतो, तो पापाचा वाटेकरी होतो.

निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तीची मानखंडनाही करू नये.

जो माणसाला ईहलोक वा परलोक सुखोपभोगास प्रवृत्त करतो त्याला धर्म म्हणतात.

कुणाशीही कलह न करता सर्वांविषयी सहानुभूती बाळगून कार्य केल्यास ते लवकर फलदृप होतं.

परसेवेसाठी नरकात देखील जाण्याची तयारी असणे, हे श्रेष्ठ कार्य होय.

जगामध्ये नेहमी दात्याची भूमिका घ्या. सर्व काही दान करा व परतीची अपेक्षा करू नका.

Leave a Comment