Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप ही ‘चमत्कारी दीप’ bedtime story मुलांना सत्य, दयाळुपणा, प्रामाणिकपणा आणि संस्कार शिकवणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. रात्री झोपण्यापूर्वी वाचण्यासाठी उत्तम कथा.

Table of Contents

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

खोट्या सवयीमुळे निर्माण झालेली समस्या

एक शांत आणि छोटसं गाव त्यात एक छोटं कुटुंब राहत होतं. त्या छोटयाशा कुटुंबात एक दयाळू आजी आणि तिचा नातू ज्याचं नाव विराज असे दोघेजण राहत होते. विराज खूप चाणाक्ष होता, पण त्याची एक सवय होती ती म्हणजे जर कधी काही चुक केली तर ते झाकण्यासाठी तो खोटं बोलत असे. आजी त्याला नेहमी प्रेमाने समजावत असे, पण त्याच्या सवयी फारशा बदलत नव्हत्या.

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

गावातील मोठ्या उत्सवाची घोषणा

एक दिवस, गावात एक मोठा उत्सव होता. त्या उत्सवात एक अद्भुत वस्तू ठेवली होती—“चमत्कारी दीप”. लोक म्हणत, “हा दीप फक्त खरं बोलणाऱ्यांच्या हातात उजळतो. ज्याच्या मनात खोटं असेल, त्याच्या हातात तो दीप काळोखासारखा मंद पडतो.”विराजचे मित्र म्हणाले,“अरे, चल ना! आपण पाहूया त्या दिव्याची जादू.”

विराजला पण कुतूहल होतं. त्याला पण बघायचं होतं की खरच असं काही आहे का. विराज त्याच्या मित्रांबरोबर उत्सवात जायला तयार झाला. गावातील प्रत्येकाला तो दीप बघायची उत्सुकता होती. तो दीप हातात घेण्यासाठी तिथे मोठी रांग लागलेली होती. प्रत्येकजण दीप हातात घेत आणि त्याच्या उजेडावरून लोकांची प्रामाणिकता ठरत असे. एका मागून एक लोक पुढे जात. काहींच्या हातात दीप उजळून चमकत होता, काहींच्या हातात अंधुक पडत होता.

Watch More On

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

पहिली परीक्षा – विराजच्या हातात दीप मंद होणे

हे पाहून विराज थोडा घाबरला.“जर माझ्या हातात दीप उजळला नाही तर?”तरीही तो धाडस करून पुढे गेला. त्याने दीप हातात घेतला… पण दीप मंदच राहिला. सभोवतालच्या लोकांचे कुजबुजणे सुरू झाले.

विराजचे डोळे पाणावले. तो खूप लाजला. तेवढ्यात दीप सांभाळणारा वृद्ध साधू त्याच्या जवळ आले आणि म्हणाले,“बाळा, दीप तुझी चूक दाखवतोय, पण तुझी क्षमता नाही हरवत. खोटं बोलणं थांबव, स्वतःशी प्रामाणिक हो. मग हा दीप स्वतःच उजळेल.”विराजला खूप वाईट वाटलं आणि तो मान खाली घालून शांतपणे घरी निघून गेला.

बदलाची सुरुवात – सत्य बोलण्याचा निश्चय

त्या रात्री आजी त्याला म्हणाली,“प्रामाणिकपणाचा प्रकाश आपल्या मनात उजळला की संपूर्ण जग उजळतं रे बाळा.”आजीचं ते बोलणं ऐकून त्या दिवशी विराजच्या मनात एक मोठा बदल झाला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उत्सवात गेला.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

दुसरी परीक्षा – दीप तेजाने उजळणे

साधूंच्या पायाशी नतमस्तक होऊन म्हणाला—“मी आता कधी खोटं बोलणार नाही.”त्याने पुन्हा दीप हातात घेतला.आणि यावेळी… दीप तेजाने उजळला..ते पाहून सभोवतालची सगळी लोकं मोठ्याने टाळ्या वाजवू लागली. विराजला फार आनंद झाला.विराजच्या चेहऱ्यावर तेज आणि आत्मविश्वास दिसत होता.त्याला कळलं की,“खोटं बोलून कुणाचं चांगलं होत नाही. पण सत्याने, मनाचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो.”

गावासाठी प्रेरणा – बदललेलं जीवन

त्या दिवसापासून गावातील मुलांनी एक धडा घेतला आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणत—“आपल्या मनातील दीप नेहमी उजळ ठेवायचा—सत्य, दयाळूपणा आणि चांगल्या सवयींनी.”आणि विराज गावातील इतर मुलांसाठी एक प्रेरणा बनला.

अजून येथे वाचा

Moral Bedtime Story That Teaches True Values | मुलांकरता बदल घडवणारी प्रेरणादायी गोष्ट – चमत्कारी दीप

शिकवण

सत्य नेहमी जिंकतं.

खोटं बोलणं मनातील प्रकाश कमी करतं.

प्रामाणिकपणा, धैर्य आणि दयाळूपणा ही मुलांची खरी शक्ती आहे.

Leave a Comment