3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा रागाचं ढग, दोन बहिणींची गोष्ट आणि मी खास आहे या तीन सुंदर झोपेच्या नैतिक कथा मुलांना भावना समजून घेणं, जळफळाट टाळणं आणि आत्मविश्वास वाढवणं शिकवतात.

Table of Contents

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

रागाचं ढग – Anger Management

Ragach Dhag – A Marathi Bedtime Story About Anger Management for Kids | रागाचं ढग – मुलांसाठी राग नियंत्रण शिकवणारी सुंदर झोपेची गोष्ट

मुलांना राग समजून घेऊन तो शांतपणे कसा हाताळायचा हे शिकवणारी सुंदर नैतिक गोष्ट. भावनांचं नियंत्रण आणि सकारात्मक विचार वाढवणारी कथा.

1. प्रस्तावना

वेदला खूप लवकर राग यायचा. खेळ हरला, गृहपाठ कठीण वाटला किंवा कोणी चिडवलं की त्याच्या मनात जणू काळं ढग दाटून यायचं.

2. रागाची सवय

एक दिवस तो क्रिकेट खेळत होता आणि त्यात तो बाद झाला. तो जोरात ओरडला, बॅट फेकून दिली आणि रागात घरी निघून गेला. त्याच्या मित्रांना वाईट वाटलं.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

3. आजोबांचा सल्ला

घरी आल्यावर आजोबांनी बघितलं की, वेद खूप रागात आहे. त्यांनी त्याला बोलावलं आणि आपल्या जवळ बसवून शांत आवाजात म्हणाले, वेद बाळा तू डोळे बंद कर आणि शांत बघ.. सांग तुला आत काय दिसतंय?वेद म्हणाला, एक मोठं काळं ढग.

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

4. समज

आजोबा हसले. राग म्हणजे ढगासारखा असतो. तो येतो… पण कायम राहत नाही. आपण त्याला थांबू दिलं तरच तो पाऊस पाडतो.

5. उपाय

आजोबांनी वेदला तीन गोष्टी शिकवल्या

10 पर्यंत मोज

खोल श्वास घे

लगेच बोलू नको.

6. परीक्षा

दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खेळ हरला. ढग परत आला… पण यावेळी वेद थांबला. त्याने श्वास घेतला. 10 पर्यंत मोजलं. तो शांत झाला.

7. बदल

मित्रांनी त्याचं कौतुक केलं. वेदला समजलं —राग येणं चुकीचं नाही, पण तो कसा हाताळतो हे महत्वाचं आहे.

शिकवण

रागावर नियंत्रण ठेवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं.

Watch More On

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

दोन बहिणींची गोष्ट – जळफळाट आणि प्रेमाची शिकवण

Don Bahininchi Gosht – A Marathi Moral Story About Jealousy Between Siblings | दोन बहिणींची गोष्ट – जळफळाट आणि प्रेमाची शिकवण देणारी कथा

भावंडांमधील जळफळाट आणि प्रेमाचं महत्व समजावणारी सुंदर नैतिक गोष्ट. मुलांमध्ये समजूतदारपणा वाढवणारी कथा.

1. प्रस्तावना

सान्वी आणि आर्या या दोन बहिणी होत्या. दोघीही हुशार आणि गोड.

2. तुलना

एक दिवस शाळेत सान्वीला बक्षीस मिळालं. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. आर्याला ते बघून कसंतरी झालं. तिच्या मनात छोटासा काटा टोचला.

3. जळफळाट

ती शांत राहिली, पण आतून तिला वाईट वाटत होतं. ती म्हणाली, आईला फक्त सान्वीच आवडते.

4. आईची समज

आईने दोघींना जवळ घेतलं आणि बसवलं. दोघींना छान समजावून सांगत होती, प्रत्येक फूल वेगळं असतं. गुलाब सुंदर, पण मोगराही तितकाच सुगंधी.

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

5. जाणीव

आर्याला ते ऐकून समजलं की, प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं. तसंच माझ्यातही काही खास गुण आहेत. सान्वीने तिचा हात धरला आणि म्हणाली, तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस.

6. शेवट

त्या दिवसापासून त्यांनी एकमेकींचं कौतुक करायला सुरुवात केली. घरात आनंद वाढला.

शिकवण

तुलना न करता एकमेकांना साथ देणं म्हणजे खरं प्रेम.

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

मी खास आहे – Self Love

Mi Khas Aahe – A Marathi Bedtime Story About Self-Love and Confidence | मी खास आहे – मुलांसाठी आत्मविश्वास आणि Self-Love शिकवणारी सुंदर गोष्ट

मुलांना स्वतःवर प्रेम करायला आणि आत्मविश्वास वाढवायला शिकवणारी प्रेरणादायी नैतिक गोष्ट.

1. प्रस्तावना

ईशा एक शांत स्वभावाची मुलगी होती. तिला वाटायचं की, मी इतरांइतकी हुशार नाही.

2. तुलना

शाळेत काही मुले चित्र छान काढायची, काही गाणी छान गायची. ईशा स्वतःची तुलना त्यांच्यासोबत करत राहायची.

3. शिक्षकांचा प्रश्न

एक दिवस शिक्षिकेने ईशाला विचारलं, ईशा तुला काय करायला आवडतं? ईशा म्हणाली, मला गोष्टी सांगायला आवडतात.

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

4. संधी

शाळेत गोष्टी सांगण्याची स्पर्धा होणार असे जाहीर झाले. ईशाने त्यात भाग घेतला. ईशाने सुंदर गोष्ट सांगितली. सगळ्यांना तिची गोष्ट फार आवडली. सगळे टाळ्या वाजवू लागले.

5. जाणीव

तिला समजलं, प्रत्येकजण वेगळा आहे. ती म्हणाली, माझ्यातही खास आहे. गोष्ट सांगण्याची कला. मी जशी आहे, तशीच छान आणि खास आहे.

3 Marathi Moral Stories for Kids – Anger Management, Sibling Jealousy and Self-Love | मुलांसाठी 3 सुंदर नैतिक गोष्टी – राग नियंत्रण, भावंडांतील जळफळाट आणि Self-Love ची प्रेरणा

6. शेवट

त्या दिवसापासून ईशा आत्मविश्वासाने हसायला लागली.

शिकवण

स्वतःवर प्रेम केल्यावरच जग आपल्यावर प्रेम करतं.

Leave a Comment