2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी या दोन Powerful Marathi Moral Stories मुलांना समजूतदारपणा, शांतता आणि अहंकाराचे नुकसान शिकवतात. बकरी आणि चिमणीच्या प्रेरणादायी कथा मुलांच्या संस्कारांना बळ देणाऱ्या, Heart-Touching आणि Life-Changing आहेत.
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
Two Goats and the Narrow Bridge | सहकार्याचा अनमोल धडा देणारी प्रेरणादायी मराठी कथा
एका नदीवर एक छोटा पूल बांधला होता. हा पूल खूप अरुंद होता. इतका अरूंद की त्या पूलावरून एका वेळेस फक्त एकालाच जाता येत असे.एके दिवशी दोन बकऱ्या समोरासमोरून येत होत्या. दोघींना तो पूल पार करायचा होता.
एक बकरी दक्षिणेकडून आली होती तर दुसरी बकरी उत्तरेकडून आली होती. अगदी पुलाच्या मध्यावर त्या समोरासमोर आल्या. त्यातील प्रत्येक बकरीला आधी पूल पार करायचा होता. दोघी खूप घाईत होत्या. त्या दोघी पुलावरच एकमेकांशी भांडायला लागल्या. भांडण करता करता त्यांचा तोल गेला. दोघीही नदीत पडल्या. गर्व आणि हट्टापायी दोन्ही वाहून गेल्या.
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
काही दिवसांनंतर आणखी एक अशीच घटना घडली. याच अरूंद पुलावर दोन बकऱ्या समोरासमोर आल्या. एक दक्षिणेकडून आली तर दुसरी उत्तरेकडून आली. त्या दोघीही घाईत होत्या. त्यामुळे दोघीही पुलावरून आधी जाण्यासाठी वाद घालू लागल्या.
काही वेळाने त्यातील एका बकरीने विचार केला, ‘हा पूल तर अरुंद आहे त्यामुळे पुलावरून पुढे जाण्यासाठी वाद घालणं उपयोगाचं नाही.’ त्यातून तिला एक कल्पना सुचली. ती दुसऱ्या बकरीला म्हणाली, वाद घालून काही उपयोग नाही त्यापेक्षा असं करू ‘मी खाली बसते, तू माझ्या डोक्यावरून चालत पलीकडे जा.
अशा प्रकारे आपल्याला दोघींनाही पूल ओलांडता येईल.’ दुसऱ्या बकरीने तिचं हे बोलणं मान्य केलं. मग एक बकरी खाली बसली. दुसरी बकरी तिच्या अंगावरून चालत पलीकडे गेली. अशा प्रकारे दोन्ही बकऱ्यांनी तो अरुंद पूल सुरक्षितपणे आणि आनंदाने पार केला.
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
बोध
भांडण न करता पर्याय शोधून मार्ग काढायला हवे.
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
The Sparrow and the Arrogant Elephant | दादागिरीला करारा धडा देणारी जबरदस्त प्रेरणादायी कथा
एका दाट जंगलात एक हत्ती राहत होता. तो खूप ताकदवान होता. शक्तीने प्रचंड असला तरी तो अहंकारी होता. त्यामुळे तो जंगलात खूप मस्ती करायचा. जंगलात जाता येताना तो झाडे उपटायचा, फांद्या मोडायचा, छोट्या प्राण्यांना घाबरवायचा. त्याच्या या वागण्यामुळे इतर पक्षी, प्राण्यांचे नुकसान व्हायचे. त्याचा त्याला आनंद वाटायचा. इतरांना त्रास देण्यातच त्याला समाधान वाटायचं. हत्तीच्या या दादागिरीला सर्व प्राणी, पक्षी कंटाळले होते. काय करावे ते त्यांना कळत नव्हते.
त्याच जंगलात एक चिमणी राहत होती. चिमणीने एका झाडाच्या फांदीवर छान घरटे बांधले. या घरट्यात तिने अंडी घातली. रोज नियमाने ती अंडी उबवीत होते. एक दिवस अंडी उबवायला आली असताना त्या बाजूला हत्ती आला. हत्ती नेहमीप्रमाणे आपल्या मस्तीमध्ये सोंडेने झाडे उपटीत होता आणि त्याने चिमणीचे घरटे असलेले झाडही उपटून टाकले. चिमणीची सगळी अंडी फुटली.
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
चिमणीच्या मनात राग, दुःख, वेदना सर्व उफाळून आले. तिने हत्तीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या मित्रांकडे गेली. एक मच्छर, सुतार पक्षी आणि एक बेडूक असे तिचे तीन मित्र होते. हत्तीला धडा शिकवण्यासाठी काय करावे याचा त्यांनी विचार केला. त्या जंगलात एक मोठा खड्डा होता. या खड्ड्यात हत्ती पडला तर त्याला बाहेर येता येणार नाही असा सगळ्यांनी विचार केला.
त्याला त्या खड्ड्यात पाडण्याची या तिघांनी योजना केली. हत्ती फिरत फिरत त्या बाजूला येताच मच्छर त्याच्या काना जवळ गेले. हत्तीला गाणे आवडत होते. मच्छर गुणगुणायला लागले. हत्ती दंग होऊन डुलायला लागला.
हत्तीचे लक्ष नाही असे पाहून सुतारपक्षी गेला आणि हत्तीच्या डोळ्यावर त्याने चोच मारली. हत्ती घायाळ झाला. डोळे मिटून इकडे तिकडे धावायला लागला. त्या खड्ड्याजवळ बेडूक बसला होता. तो जोर जोराने ओरडायला लागला. बेडकाचे ओरडणे हत्तीने ऐकले. त्याला वाटलं तिकडे तळे आहे. हत्ती खड्ड्याकडे गेला आणि खड्ड्यात पडला. मदमस्त हत्तीची त्यांनी चांगलीच खोड मोडली.
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
2 Powerful Moral Stories for Kids | संघर्ष, समजूतदारपणा आणि दादागिरीवर मात करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी
बोध
दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच कुणाचं भले होत नाही.