Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा “हरवलेली सावली” ही एक हृदयाला भिडणारी, जादूने भरलेली आणि भावनिक Bedtime Story आहे जी मुलांना धैर्य, आत्मविश्वास आणि प्रेमाचा खरा अर्थ शिकवते. झोपायच्या आधी वाचण्यासाठी ही सुंदर प्रेरणादायी मराठी कथा नक्की वाचा.

Table of Contents

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

गंधारी गावातील कल्पक मुलगा – अनय

गंधारी गावात अनय नावाचा मुलगा राहत होता. अनय सात वर्षांचा होता. तो एक शांत, विचार करणारा आणि अतिशय कल्पक मुलगा. अनयची एक खास गोष्ट होती ती म्हणजे तो जेव्हा खेळायचा, तेव्हा त्याला त्याची सावली दिसत आणि तो त्याच्या सावलीसोबत बोलायचा. त्याची सावली, तिचं नाव त्याने ठेवलं होतं “छाया”. अनयला वाटायचं की छाया त्याची खरी मैत्रीण आहे. आपल्याला कधी न सोडणारी, नेहमीच सोबत असणारी, काहीही झालं तरी साथ देणारी.

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

अनयची सावली अचानक गायब होते

एके दिवशी मात्र अजब घडलं…संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळत असताना अनय बागेत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याने पाहिलं त्याच्या पायाखाली सावलीच नाही. त्याने विचार केला की बहुतेक प्रकाश कमी आहे म्हणून मला दिसत नाही. म्हणून तो उजेडात गेला पण तरीही त्याला सावली दिसेना. अनयचं हृदय धडधडायला लागलं. छाया… तू कुठे गेलीस? त्याने हळू आवाजात विचारलं.

उत्तर नाही...

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

आईचे दिलासादायक शब्द

रात्री तो घाबरून आईजवळ बसला.आईने विचारलं, काय झालं अनय ? अनय म्हणाला, आई… माझी छाया हरवली. ती मला सोडून गेली. का गेली असेल ती ? आईने प्रेमाने अनयच्या केसांवर हात फिरवला, आणि म्हणाली, कधी कधी आपण स्वतःला हरवून बसतो तेव्हा आपली सावलीही हरवते. उद्या पुन्हा शोधूया. पण अनयला झोप येईना. तो स्वतःला विचारत राहिला, मी काही चुकीचं केलं का? मी वाईट मुलगा आहे का?””छाया मला का सोडून गेली असेल?” असे बरेच प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते.

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

स्वप्नातील चंद्रवृक्ष

त्या रात्री अनयला एक स्वप्न पडलं.स्वप्नात तो एका प्रकाशमय जंगलात गेला. चांदण्यांचा नदीसारखा प्रकाश झाडांवर पडत होता. त्या जंगलात एक प्राचीन, तेजस्वी झाड उभं होतं, ते म्हणजे ‘चंद्रवृक्ष’.त्या झाडाच्या खाली त्याला कुणीतरी दिसलं ती होती छाया.पण ती दुःखी दिसत होती.

अनय तिच्याकडे धावत गेला. छाया! तू मला सोडून का गेलीस? छायाने शांत आवाजात म्हटलं, अनय, मी कधीच तुला सोडून गेले नाही… तू स्वतःला विसरून गेलास. अनय चकित झाला—मी? मी कसा विसरलो स्वतःला? छाया म्हणाली, तू इतरांच्या बोलण्याने घाबरायला लागलास. तू स्वतःला कमी समजू लागलास. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस, तेव्हा मी सुद्धा कमकुवत होते… आणि दिसेनाशी होते.”

Watch More On

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

सावली परत आली

अनयच्या डोळ्यांत पाणी आलं. मला वाटलं तू मला नको म्हणालीस…छायाने हलकेच त्याला स्पर्श केला, मी तुझा भाग आहे, अनय. तू मला कधी गमावू शकत नाहीस. फक्त स्वतःवर प्रेम कर… मी परत येईन. त्याचवेळी चंद्रवृक्षाचा प्रकाश तीव्र झाला आणि सगळं धूसर होत गेलं…अनय दचकून उठला.

पहाटेची कोवळी किरणं खोलीत उतरत होती. तो लगेच उभा राहिला आणि खिडकीजवळ गेला. त्याची नजर जमिनीवर गेली. तर त्याला दिसलं की सावली परत आली होती. तो आनंदाने ओरडला, छाया!! सावली जणू हसल्यासारखी दिसत होती.

Unforgettable Bedtime Story | हरवलेली सावली – एक भावनिक, जादुई आणि जीवन बदलून टाकणारी झोपेपूर्वीची कथा

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

स्वतःवर प्रेम करण्याचा अनयचा निर्धार

त्या दिवसापासून अनयने स्वतःला कमी लेखणं थांबवलं. तो प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करू लागला. तेव्हा त्याला समजलं की सावली कधीच हरवत नाही… आपणच तिला हरवून बसतो. आणि त्या दिवसापासून छाया आणि अनयची मैत्री अधिक घट्ट झाली. एक अशी मैत्री जी मुलांना शिकवते की स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा… आणि कोणतीही भीती तुमची सावली हिरावून नेऊ शकत नाही.

शिकवण

स्वतःला कधीही कमी समजू नका.

स्वतःवर प्रेम आणि विश्वास ठेवा, कारण भीती आणि शंका आपली ‘सावली’ म्हणजेच आत्मविश्वास हरवून टाकतात.

जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा कोणतीच भीती तुमचं प्रकाशमान अस्तित्व हरवू शकत नाही.

Leave a Comment