The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा हनुमानाचा दिव्य जन्म, मातृभक्ती, देवतांचे आशीर्वाद आणि बालपणीच्या अद्भुत लीलांनी भरलेली ही प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा वाचा. शक्ती, करुणा आणि चमत्कारांनी नटलेली ही पौराणिक कथा भक्तांसाठी, मुलांसाठी आणि अध्यात्मिक वाचकांसाठी उत्तम आहे.
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
हनुमानाचा जन्म आणि बालपणीच्या लीला
पवनपुत्र हनुमानाचा जन्म हा विश्वातील सर्वात अद्भुत चमत्कारांपैकी एक मानला जातो. हनुमानाच्या जन्माची कथा ही त्याची आई अंजना यांच्या कथेशी संबंधित आहे. हनुमान हा भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक.
हनुमान आपल्या असीम भक्ति, अफाट शक्ती आणि विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पूजला जातो. हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मुला व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत होती. ही कथा आहे एका साध्या पण महान आईची म्हणजेच अंजनीमातेची… आणि दैवाने घडवलेल्या त्या दिव्य लीलांची.
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
अंजनीमातेची तपश्चर्या
त्रेतायुगातील एक निर्मनुष्य पर्वतप्रदेश. तिथे अंजनीमाता कठोर तप करत असे. तिच्या मनात एकच इच्छा. देवा, मला असा पुत्र दे… जो भूमीवर धर्मरक्षण करेल! तिची प्रार्थना आकाशातून थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचली.
शिवांच्या करुण मनात तीव्र भाव उमटला. त्याचवेळी राजा दशरथ पुत्रेष्टी यज्ञ करत होता. अग्नीदेवाने दिलेला “पायसम” वाऱ्याच्या वेगाने अंजनीमातेच्या हातात आला. वायूदेवांनी स्वतः ते प्रसादरूपाने तिच्यापर्यंत पोहोचवले.
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
अंजनीमातेने प्रसाद घेताच तिच्या अंगभर एक अलौकिक तेज पसरलं…आणि त्या क्षणी विश्वाच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य वीराचा जन्म झाला —“हनुमान!” दिव्य जन्म अंजनीमातेच्या कुटीत तो तेजोमय बालक जन्माला आला.
त्याचे शरीर सूर्याप्रमाणे तेजस्वी, डोळे ज्वालांसारखे चमकदार आणि अंगात अनंत शक्ती. देवांनी आकाशभर उत्सव केला. गंधर्व, अप्सरा, ऋषी—सर्वांनी त्या दिव्य जन्माचा साक्षात्कार घेतला. वायूदेव आनंदाने हाक मारत म्हणाले—“हा माझा पुत्र! पृथ्वीवरील धर्मरक्षणासाठी जन्मलेला. सूर्याला गिळायला गेलेला बालहनुमान.
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
एका सकाळी अंजनीमाता बाहेर धान्य निवडत होती. हनुमान बाहेर मैदानात खेळत होता. तेव्हा आकाशात लाल-गोल सूर्य उगवला. बालहनुमानचं लक्ष त्याकडे गेलं आणि ते पाहून त्याला फार आनंद झाला. हनुमान आनंदाने उड्या मारत आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई! आई! तिकडे बघ ना. किती मोठ्ठं फळ आहे! मला ते फुल खायचं आहे. मी ते खातो! असं म्हणत क्षणात तो आकाशात झेपावला! देव घाबरले. सूर्यदेवही थरकापले.
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
बालहनुमान सूर्याजवळ जात म्हणाला, तू किती गोड दिसतोस! मला खायचंय तुला. आणि असं म्हणत त्याने सूर्याला स्पर्श करायला गेला पण अंगारासारखे उष्ण किरणही त्याला स्पर्श करू शकले नाहीत. अशा प्रसंगी इंद्रदेवाने वज्र सोडले, आणि बालहनुमान खाली कोसळला. वायूदेवाने क्रोधाने विश्वातील हवा थांबवली. जीव संकटात. देवांनी धावत येऊन माफी मागितली आणि बालहनुमानाला अद्भुत वर दिले.
ब्रह्मदेव: तुला कोणतेही अस्त्र लागू शकणार नाही.
विष्णू: तुझं नाव अनंतकाळ स्मरणात राहील.
शिव: तू माझा अंश, अतुल शक्तिवान असशील.
अग्नी: तुला अग्नीतही काही होणार नाही.
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
ऋषींचे आश्रम आणि चमत्कार
एकदा ऋषींच्या आश्रमात तो गेला. तिथे मुलं रडत होती. फळं बंदरांनी हिसकावून घेतली होती. हनुमान म्हणाला,थांबा! मी आणतो! त्याने पर्वतावर उडी मारली, झाडं हलवली आणि टोपल्या भरून फळं घेऊन आला. मुलं आनंदून त्याच्या गळ्यात पडली. ऋषी म्हणाले, बाळा, तू फक्त शक्तिशाली नाहीस… तू करुणामय आहेस.
मित्रांची मदत करणं आणि धाडसी खेळगावातील माकडे त्याचे मित्र होते. ते त्याच्यासोबत या झाडावरून त्या झाडावर खेळत असत. एकदा एक पिल्लू विहिरीत पडलं. कोणी त्या पिल्लास बाहेर काढायलाही तयार नाही. हनुमान म्हणाला, माझे मित्र संकटात! मी कसा बसू? हनुमानाने विहिरीत उडी घेतली आणि विहीरीत अडकलेल्या त्या पिल्लाला त्याने अलगद बाहेर काढलं. सर्व जणांनी जयघोष केला —“जय हनुमान!”
The Miraculous Birth of Hanuman | शक्ती, भक्ति आणि अद्भुत बाललीला उलगडणारी प्रेरणादायी कथा
शिकवण
अंजनीमातेने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली—बाळ हनुमान, बल हे जितकं महत्त्वाचं… पण त्याहीपेक्षा मोठी तुझ्या मनातील करुणा आहे.”
त्या दिवशी बालहनुमानाने स्वतःला तीन गोष्टी दिल्या—
संकटात धावून जाण्याचं धाडस.
सर्व जीवांबद्दल करुणा.
शक्तीचा योग्य उपयोगहीच कारणे पुढे त्याला “रामभक्त हनुमान” बनवतील.