The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये छोट्या छोट्या बाल कलाकारांसाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत. हुशार ससा आणि सिंह या गोष्टीमध्ये आपण शिकणार आहे की ससाने त्याच्या हूशारीने कशी सिंहावर मात केली.या गोष्टीतून आपण एकच शिकवण घेणार आहे ती म्हणजे आपल्या बुद्धीच्या जोरावर योग्य त्या वेळी योग्य तो विचार करून आपण मात करू शकतो .चला तर मग बघूया.

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

एका घनदाट जंगलात एक मोठा, बलवान आणि क्रूर सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा मानला जात असे. परंतु या सिंहाची एक वाईट सवय होती. तो दररोज शिकार करण्यासाठी निघाला की जंगलात दिसेल त्या प्राण्याला मारून खात असे. हे सगळं पाहून जंगलातील प्राणी घाबरून पळून जायचे, लपून बसायचे, पण सिंह इतका शक्तिशाली होता की कोणीही त्याच्या तावडीतून सुटू शकत नव्हते.

हळूहळू जंगलातील प्राणी घाबरून गेले. हरणे, ससे, चिमण्या, अगदी माकडेसुद्धा दिवसभर भीतीने जगू लागली.जंगलात फिरायला त्यांना भीती वाटू लागली.“आज कोण शिकार होईल?” हा प्रश्न प्रत्येक प्राण्याच्या मनात कायम असायचा.

प्राण्यांची सभा

एके दिवशी सगळया प्राण्यांनी एक सभा जमवली. सगळ्यांना सिंहाच्या भीतीतून मुक्त व्हायचं होतं. त्यांनी विचार केला, “जर आपण सगळे एकत्र त्याला विरोध केला तर आपल्याला त्याचा राग सहन करावा लागेल. पण जर आपण रोज ठरवून एखादा प्राणी त्याच्या जेवणासाठी पाठवला, तर उगाच पळापळ, भीती, मारामारी होणार नाही.”

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि सिंहाजवळ गेले. प्राण्यांचा नेता, एक म्हातारा गाढव सिंहाला म्हणाला,

“महाराज, आम्ही सगळे प्राणी तुमच्या भीतीने खूप घाबरलो आहोत. दररोज तुम्ही शिकार करता, त्यामुळे जंगलातील शांती भंग होते. आम्ही ठरवलं आहे की रोज आमच्यातील प्राणी स्वखुशीने तुमच्याकडे येतील. तुम्ही वेगळं शिकारीला जाऊ नका.”

सिंह विचारात पडला. त्याला ही योजना खूप आवडली. आता त्याला शिकारीचा त्रास उरणार नव्हता. रोज जेवण त्याच्याकडे स्वतःहून येणार होतं. त्याने मान्य केलं.

सश्याची पाळी

काही दिवस असेच गेले. रोज एक एक असं करत प्राणी सिंहाजवळ गेले आणि सिंहाने त्यांना खाल्लं. जंगलातली प्राण्यांची भीती थोडी कमी झाली. पण सगळ्यांच्या मनात एक भीती होतीच “उद्या आपली पाळी आली तर?”

एक दिवस सश्याची पाळी आली. ससा लहानसा, चपळ आणि शहाणा होता. त्याने विचार केला, “जर रोज आपण असेच स्वतःला बळी देत राहिलो, तर शेवटी सगळं जंगल संपेल.जंगलात प्राणी राहणार नाही. काहीतरी करायला हवं.”त्याने एक योजना आखली.

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

सिंहाजवळ जाण्यात उशीर 

ससा मुद्दाम उशिरा सिंहाजवळ गेला. त्या वेळी सिंह खूपच भुकेला झाला होता. त्याला खूप संताप आला.

सिंहाने मोठ्याने गर्जना केली.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

“ए ससा! यायला इतका उशीर का केला? माझ्या जेवणाची वाट लावलीस ना? तुला मी जिवंत सोडणार नाही!”

ससा घाबरलेला असल्यासारखा दाखवू लागला, पण तो हुशार होता. तो म्हणाला

“महाराज, माझा दोष नाही. मी लवकर निघालो होतो. पण वाटेत मला दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, ‘मीच खरा जंगलाचा राजा आहे. सगळे प्राणी माझ्याकडे येतील.’ त्यामुळे मला उशीर झाला.”

हे ऐकून सिंहाला फार राग आला. तो गुरगुरत म्हणाला,

“काय? दुसरा सिंह? माझ्या जंगलात? मीच या जंगलाचा राजा आहे. मला दाखव कुठे आहे तो!”

ससा म्हणाला

“महाराज, तो एका मोठ्या विहिरीत आहे. मला तुमच्याशी भांडायला सांगत होता. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाईन.”

सिंहाला आपली ताकद दाखवण्याची घाई झाली. तो सशाच्या मागे चालू लागला.

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

विहिरीजवळचा खेळ

ससा सिंहाला घेऊन जंगलाच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या, खोल विहिरीजवळ आला. विहिरीत स्वच्छ पाणी होतं. ससा म्हणाला

“महाराज, हाच तो सिंह आहे. या विहिरीत बघा.”

सिंहाने विहिरीत डोकावलं. पाण्यात त्याला स्वतःचं मोठं प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं खरोखरच दुसरा सिंह आहे. तो गुरगुरला, तोंड उघडलं, आणि त्याला पाण्यातील सिंहही तसाच दिसला.

सिंह रागाने जोरात गर्जला. पाण्यातलं प्रतिबिंबही गर्जलं.

सिंहाला आणखी राग आला. “हा माझ्याशी स्पर्धा करतोय!” तो म्हणाला.

क्षणाचाही विचार न करता त्याने विहिरीत उडी मारली.

पाणी उसळलं, सिंह खोल पाण्यात गेला. त्याला बाहेर यायची ताकद उरली नाही.

The Magical Tale Of The Clever Rabbit And The Lion|हुशार ससा आणि सिंह

जंगलात आनंद

सगळं जंगल मोकळं झालं. सिंहाचा शेवट झाला. सगळे प्राणी सश्याभोवती जमले. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं.

“तू आमचं प्राण वाचवलंस. तू छोटा आहेस पण खूप शहाणा आहेस.”

ससा हसला आणि म्हणाला,

“शक्तीपेक्षा बुध्दी मोठी असते. संकट कितीही मोठं असलं तरी हुशारीने त्यावर मात करता येते.”

Watch More On

शिकवणूक

हुशारी आणि बुध्दी बलापेक्षा मोठी असते.

संयम ठेवून योग्य वेळी युक्ती लावली तर कोणतंही संकट दूर करता येतं.

भीतीतून मार्ग शोधण्याऐवजी उपाय शोधणे गरजेचे आहे.

https://amzn.in/d/h5CxsT1

Leave a Comment