The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय ही एक खळखळून हसवणारी मराठी बालकथा आहे, जिथे स्वयंपाकघरात झालेली एक छोटीशी चूक संपूर्ण गावासाठी मोठा हास्याचा विषय बनते. ही एक खळखळून हसवणारी मराठी बालकथा आहे, जिथे स्वयंपाकघरात झालेली एक छोटीशी चूक संपूर्ण गावासाठी मोठा हास्याचा विषय बनते. साध्या घटनेपासून सुरू झालेली ही गोष्ट मजेशीर वळणं घेत घेत गावभर गोंधळ, गैरसमज आणि धमाल प्रसंग निर्माण करते.
गमतीशीर पात्रं, निरागस मुलांचं कुतूहल आणि हलकाफुलका विनोद यामुळे ही कथा मुलांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. हसता-हसता काहीतरी शिकवण देणारी ही गोष्ट मुलं, पालक आणि हास्यकथांचे प्रेमी यांच्यासाठी परफेक्ट आहे. ब्लॉग वाचनासाठी, मुलांना गोष्ट सांगण्यासाठी किंवा हलक्याफुलक्या मनोरंजनासाठी ही मराठी funny story नक्कीच वाचावी अशी आहे. एक छोटी चूक कशी मोठं हास्य निर्माण करू शकते, हे या कथेतून गमतीशीर पद्धतीने समोर येतं!
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
🤣 मोहरीचा महाप्रलय
चिंटू हा गावभर प्रसिद्ध असलेला मुलगा. पण एकदम उलटा-पलटा मुलगा! तो काहीही काम करायला गेला की काहीतरी गोंधळ हमखास करून ठेवणारच. एके दिवशी त्याची आई स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती. स्वयंपाकात आई व्यस्त होती. त्याच्या आईला स्वयंपाक करताना भाजीला फोडणी द्यायची होती. पण फोडणीसाठी मोहरीच नव्हती. मोहरीची गरज पडली होती.
आईने चिंटूला आवाज दिला. “चिंटू, जरा मोहरी आणून देतोस का? ” आई म्हणाली. चिंटू हो आई म्हणत, लगेच पळत पळत गेला. मांडणीमध्ये ठेवलेल्यछो छोट्या बरणीत मोहरी होती. चिंटू घाईघाईत ती बरणी घ्यायला गेला. ती बरणी उचलताना त्याचा हात बरणीतून घसरला…बरणी फिस्स्स्स्स खाली पडली..मोहरी फट..फट..फट उड्या मारायला लागली… आणि सगळीकडे श्रीगणेशा झाला! चिंटू त्या मोहरीकडे बघून म्हणाला, “ही मोहरी इतकी का नाचते?
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
🐓 कोंबड्यांचं युद्ध
मोहरी अंगणात पडताच बाहेर असलेल्या कोंबड्या धावत धावत खायला आल्या. एकेक करून पाच कोंबड्या मोहरीवर तुटून पडल्या. काही क्षणात सगळ्या कोंबड्यांना ACHOO!! ACHOO!! जोरजोरात शिंका येऊ लागल्या! गावात पहिल्यांदाच कोंबड्यांचे एकाच वेळी शिंकण्याचे जणू काय कॉन्सर्ट सुरू झाले. काका धावत आले आणि ओरडले, “अगं चांडोबा! या कोंबड्यांना सर्दी झाली की काय? की मोहरीचा अतिरेक झाला? ”काकांच्या बोलण्यावर सगळे हसून वेडे झाले.
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
🐄 गाय–पोपट–बकरीची एन्ट्री
मोहरीचा वास अंगणभर पसरला आणि इतर प्राणीही आकर्षित झाले. गाय आली, बकरी आली, आणि अगदी शेजारचा पोपट सुद्धा मोहरीकडे खाली आला. पण मोहरी जवळ गेल्याबरोबर—गाय म्हणाली, “मामामाम!” बकरीने मे मे काढत नाचायला सुरुवात केली, आणि पोपट एकदम पंख उडवत म्हणाला—“अरे मूर्खा चिंटू! मोहरी कुठं टाकतोयस? ”चिंटूने डोकं खरडलं, “मी काय केलं? मोहरीनंच सुरुवात केली!”
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
🌪 मोहरीचा वादळ-दंगल
प्राणी एवढे माजले की त्यांनी संपूर्ण अंगणात धुमाकूळ घातला. सगळया अंगणात मोहरीच मोहरी झाली होती. बाहेर अंगणात असलेली भांडी खाली पडली, बादल्या होत्या त्या उलट्या पलटया झाल्या, कपडे इकडे तिकडे उडून गेले, आणि एकेक करून गावकरी जमायला लागले.
बाहेरून काकू आत आल्या आणि म्हणाल्या, “अगं, लग्नाच्या बँडपेक्षा जास्त आवाज येतोय! ”आईने चिंटूला रागाने पाहून विचारलं, “तू हे काय केलंस चिंटू? ”चिंटू शांतपणे म्हणाला,“ मला मोहरीने धडा शिकवला. ”गावकर्यांनी हसून हसून पोट धरलं. मोहरीच्या या हाहाकाराला गावकऱ्यांनी नाव दिलं—“मोहरीचा महाप्रलय.”
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
🤭 आईचा अंतिम निर्णय
सगळा गोंधळ थांबल्यावर आई आली आणि हसत म्हणाली, “चिंटू, पुढच्या वेळी मोहरी मीच काढते रे बाळा. तू फक्त दूरून बघायच काम कर. ”चिंटू म्हणाला, “हो आई, मी आता परत मोहरीजवळ जाणार नाही. मी मोहरीपासून १० फुट अंतरांवर राहील. गावात अजूनही लोक मजेत बोलतात—“मोहरी पाहिली की चिंटूची आठवण येते!
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
The Great Mustard Disaster | Funny Marathi Story for Kids | मोहरीचा महाप्रलय
शिकवण
• छोट्या चुका मोठा गोंधळ करू शकतात—पण त्यातूनही हास्य मिळू शकतं!
• अति घाई म्हणजे अति गोंधळ.
• कधी कधी गमतीत झालेले प्रसंग आयुष्यभर लक्षात राहतात.