The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा ही एक अत्यंत भावनिक, हृदयाला भिडणारी मराठी कथा आहे. मातीतून जन्मलेली मृणाली आणि तिच्या आई-वडिलांचं नातं वाचकांच्या डोळ्यात अश्रू आणेल. प्रेम, गमावणं, देवाची परीक्षा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेली ही कथा नक्की वाचा.
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
अपूर्ण स्वप्न
कोकणातल्या एका लहानशा गावात दत्तू आणि सरस्वती दोघे राहत होते. देवाने त्यांना फार काही दिलं नव्हतं, आहे त्या परिस्थितीत ते एकमेकांसोबत छान राहत असत. पण त्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट त्यांना सतत अपूर्ण वाटायची ती म्हणजे मुलाचं हसणं. सरस्वतीचं मन कायम उदास असायचं.
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
शेजारच्या हशांचा सल
शेजारच्या घरातून येणाऱ्या मुलांच्या किलबिलाटाकडे ती खिडकीतून कितीवेळ फक्त बघत बसायची. कधी डोळ्यांत पाणी यायचं, तर कधी ती स्वतःलाच समजावायची,“देवाची इच्छा असेल, तर तो देईल.”
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
पावसाळ्याचा दिवस
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. एकदा मुसळधार पाऊस पडत होता. घरामागचं अंगण चिखलानं भरून गेलं होतं. दत्तू शेतावर गेला होता. सरस्वती अंगणात उभी राहून पावसाकडे बघत बसली होती. पावसाचा आनंद घेत होती. तिचं लक्ष ओलसर मातीकडे जातं. सरस्वतीने ती ओलसर माती हातात घेतली. तिला त्या मातीत काहीतरी वेगळंच जाणवलं जसं की उबदारपणा.
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
मातीचा पुतळा
अचानक सरस्वतीच्या मनात विचार आला की, “मी जर या मातीपासून एक लहान बाहुली केली तर… फक्त पाहायला. ”तिनं लगेच करायला सुरुवात केली. हळूहळू तिने त्या मातीपासून छोटासा पुतळा घडवला म्हणजेच लहानशी गोड मुलगी. त्या बाहुलीचे डोळे, केस, हात… सगळं अगदी जिवंत वाटत होतं. नकळत तिच्या ओठांवर हसू आलं. रात्री ती त्या बाहुलीकडे पाहतच झोपी गेली.
देवाचं चमत्कारिक वरदान
सकाळी सरस्वती उठली आणि दार उघडलं. दार उघडताच तिला धक्का बसला. अंगणात एक लहान मुलगी उभी होती. ती मातीने माखलेली, थरथरत होती. सरस्वतीच्या पायाखालची जमीन सरकली. ती मुलगी हळू आवाजात म्हणाली,“आई…”घरात आलेला आनंददत्तू धावत आला. दोघंही स्तब्ध झाले. देवाने त्यांच्या ओंजळीत आनंद ओतला होता. त्यांनी तिचं नाव ठेवलं होतं मृणाली.
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
मृणालीचं गूढ वागणं
मृणाली सगळ्यांची लाडकी झाली. ती खेळायची, हसायची, पण एक वेगळीच गोष्ट तिच्यामध्ये होती, ती पाण्यापासून नेहमी दूर राहायची. पावसात बाहेर पडायला घाबरायची. पाण्याची जणू काय तिला भिती वाटत होती.
जत्रेचा दिवस आणि पावसात हरवलेली मुलगी
एक दिवस गावात मोठी जत्रा भरली होती. मुलं नदीकाठी खेळायला गेली. मृणालीही त्यांच्या मागे गेली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. सरस्वतीचं काळीज धडधडू लागलं.“मृणाली!”सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. शेवटी नदीकाठी फक्त तिच्या छोट्या पावलांचे ठसे दिसले… आणि ते पाण्यात विरलेले. सरस्वती कोसळली. दत्तूच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
मातीचं सत्य
त्या रात्री सरस्वतीला स्वप्न पडलं. मृणाली मातीच्या स्वरूपात उभी होती आणि म्हणाली, “आई, मी फक्त तुमच्यासाठी आले होते… पण मातीला तर परत मातीच व्हावं लागतं ना.”
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
The Girl Born from Mud | An Emotional Marathi Story That Will Make You Cry |मातीपासून जन्मलेली मुलगी | रडायला लावणारी, हृदयस्पर्शी मराठी कथा
शेवटची भेट
सकाळी अंगणात फक्त एक छोटा मातीचा पुतळा पडलेला होता. सरस्वतीनं तो उचलला, डोळ्यांत अश्रू होते, पण ओठांवर शांत हसू. “देव देतो… आणि परत घेतोही. पण तो आठवण मात्र कायम ठेवतो. ”त्या दिवसापासून दत्तू-सरस्वती गावातल्या प्रत्येक अनाथ मुलाला आपलंसं करू लागले. त्यांना आई बापाचं प्रेम देऊ लागले. कारण मृणाली गेली होती, पण आई-बाप बनवून गेली होती.