The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया ही मराठी हास्यकथा “शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया” तुम्हाला नक्कीच हसवेल! वाचा एका साध्या शेजाऱ्याच्या मजेदार गमतीजमतींची कथा. जिथे फिटनेस, आयडिया आणि हसवणूक एकत्र येतात. हलकंफुलकं वाचन, आनंदाची खात्री.

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

राजाभाऊ – गल्लीतले स्टार

आपल्या गल्लीतील सगळ्यांच्या चर्चेचा विषय असतो — राजाभाऊ. राजाभाऊ म्हणजे एकदम भन्नाट माणूस. रोज काहीतरी नवीन कल्पना, नवीन प्रयोग, आणि सगळ्यांना हसवणाऱ्या गोष्टी. त्यांची प्रत्येक आयडिया इतकी वेगळी असते की लोकं कधी हसतात, कधी डोकं धरतात!

फिटनेसचा पहिला प्रयोग

एक दिवस राजाभाऊ ठरवतात की आता आपल्याला फिट व्हायचंय. ते म्हणाले, मी रोज सकाळी धावायला जाणार. गल्लीतले सगळे ऐकून थक्क झाले आणि राजाभाऊकडे बघत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाभाऊ निघाले धावायला सोबत टॉवेल, बाटली आणि काही बिस्कीटं घेऊन. दहा मिनिटांनी परत आले.

शेजारची मंगलाबाई विचारते, राजाभाऊ धावायला गेलात आणि एवढ्या लवकर परत आलात तुम्ही? राजाभाऊ हसत म्हणाले, अगं, मी धावलोच नाही. आधी रोड तपासायला गेलो होतो. आता धावणं उद्यापासून सुरू करणार. सगळे खळखळून हसले.

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

हेल्मेटचा कमाल प्रयोग

दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाभाऊ निघाले धावायला. यावेळी मात्र त्यांनी टॉवेल बाटली आणि बिस्किट न घेता , हेल्मेट घातलं होतं. लोकं विचारतात, राजाभाऊ, तुम्ही धावायला जाताय की स्कूटरवर? आज हेल्मेट घालून निघालात. राजाभाऊ गंभीरपणे म्हणाले, अरे, जर मी धावताना पडलो तर? सेफ्टी फर्स्ट ना. लोकं हसून लोटपोट झाली.

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

नवीन शूज आणि टॅगची गंमत

तिसऱ्या दिवशी परत एकदा निघाले धावायला. यावेळी राजाभाऊंनी नवीन शूज घेतले होते. आणि ते शूज घालून निघाले धावायला. पण राजाभाऊ शूजचा प्राइस टॅग काढायलाच विसरले. ते परत आले आणि म्हणाले, आज तर सगळे माझ्याकडे बघत होते. गल्लीतले लोक म्हणाले, हो बघणारच ना, शूजचा टॅग अजून लटकत होता.

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

Watch More On

फिटनेस क्लासची भन्नाट आयडिया

एक दिवस राजाभाऊ म्हणाले, आता मीच फिटनेस ट्रेनर बनणार आहे. मी माझं नवीन सेंटर चालू करणार आणि त्याचं नाव असणार राजाभाऊ फिटनेस फॅक्टरी. राजाभाऊंनी सगळ्यांना बोलावलं आणि त्यांची ही कल्पना सांगितली.

सगळे हसत हसत आले पाहायला. राजाभाऊ म्हणाले, सुरुवात करण्याआधी सगळ्यांनी चहा प्या आणि पोहे खा, मग आपल्याला एनर्जी मिळेल. क्लास सुरू झाला पण व्यायामाऐवजी सगळे चहा- पोहे खात बसले. राजाभाऊ हसत म्हणाले, हा आपला चहा-फिटनेस प्रोग्राम. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स.

अजून येथे वाचा

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

राजाभाऊ – हसवणुकीचे डॉक्टर

त्या दिवसानंतर गल्लीतले लोक राजाभाऊंना पाहिले की आधीच हसू लागतात. त्यांच्या गंमती म्हणजे सगळ्यांच्या दिवसाची नवीन सुरुवात. राजाभाऊ स्वतःच म्हणतात, जीवनात थोडी हसवणूक नसेल, तर जगणं म्हणजे केमिस्ट्रीच्या प्रयोगातलं बोअर फ्लास्क काहीच प्रतिक्रिया नाही.

The Funny Neighbour – Rajabhau and His Crazy Ideas | शेजारचा राजाभाऊ आणि त्याच्या भन्नाट आयडिया

शिकवण

हास्य हीच खरी औषधं. राजाभाऊंसारखं थोडं वेडं पण आनंदी जगणं, आपल्याला रोज हसण्याचं कारण देतं. हसत रहा, कारण आनंद हा सर्वात चांगला फिटनेस आहे.

Leave a Comment