Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं नमस्कार मित्रांनो तर आज आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत ज्यात तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी वाचायला मिळणार आहेत. आज आपण अशीच एक छान गोष्ट घेऊन आलो आहोत की ज्यात कसा एक गरीब परिस्थितीत राहणारा मुलगा स्वतःच्या जिद्दीवर सगळी स्वप्ने पूर्ण करतो आणि त्याला कमी लेखणारी लोक होती त्यांची तोंड त्याने कसे बंद केले.तर चला वाचूया मग…
Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं
एका छोट्याशा खेडेगावात राजू नावाचा मुलगा राहत होता.राजू अतिशय शांत साधा पण त्याची स्वप्न खूप मोठी होती.राजू नेहमी स्वप्न बघत असत की तो मोठा होऊन काहीतरी स्वतःच: काम सुरु करेल आणि घराला हातभार लावू शकेल. पण त्या गावातील लोक त्याला सतत बोलत की हा मुलगा मोठा होऊन काहीही करू शकणार नाही ,कारण त्याच्याकडे ना पैसा आहे ना ओळखी आहेत.राजूला हे ऐकून खूप वाईट वाटायचं पण त्याने ठरवलं होतं की जीवनात काहीतरी मोठं करायचंच आणि मग त्याच्या संघर्षाची सुरुवात झाली.
Inspirational Stories:One Small Step Can Change Life
राजूच्या घरची परिस्थिती खूपच बिकट होती.राजूचे वडील शेतीकाम करत असत.आई गावातील लोकांच्या घरी घरकाम करत होती. त्याच्या वडिलांच्या डोक्यावर कर्ज फार होत.राजूला ते कर्ज फेड करून आपल्या वडिलांना त्यातून मोकळ करायच होत. तो रोज विचार करत की आपण हे कर्ज कसं फेडू शकू आणि तो त्याच प्रयत्नात असत.
Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं
राजूचे मित्र शहरात जाऊन नोकरी करू लागले पण राजूकडे शिक्षण पूर्ण करण्याइतके सुद्धा पैसे नव्हते.रोज रात्री झोपताना राजू विचार करायचा की आपण खरंच स्वप्न पूर्ण करू शकतो का की लोक बरोबर बोलतात की आपण काहीच करू शकणार नाही ? पण राजूची आई त्याला सतत एक वाक्य बोलत असे ते त्याच्या मनात घुमत राहायचं ते म्हणजे “जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्की मिळतोच”
राजूच पहिलं छोटं पाऊल
राजूच्या गावातल्या शाळेत एकदा स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर लागलं होतं तिथे लोकांना संगणक कसा वापरायचा, छोटा व्यवसाय सुरू कसा करायचा, इंटरनेटवरून काम कसं करायचं.राजूने विचार केला की मोठे यश मिळवण्यासाठी सुरुवात लहानशा पावलाने करता येते. मग त्याने ठरवलं की संगणक शिकायचं आणि संगणक शिकून त्यावर छोटं काम सुरु करायच.
Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं
हार न मांडण्याचा निर्धार
राजूने शहरात जायच ठरवल.पण शहरात जाऊन संगणक क्लासेस करायला त्याच्याकडे पुरेसे पैसेच नव्हते म्हणून तो त्याच्या गावातील एका जुन्या संगणक दुकानात रोज दोन तास काम करू लागला. संगणक शिकायच हेच त्याने ठरवल.त्याबद्दल त्याला पैसे नको होते फक्त संगणक शिकायची संधी हवी होती.गावातील लोक त्याला फार हसले, मोफत काम करून काय मिळणार पण काही महिन्यात राजूला संगणक इंटरनेट टाइपिंग ,फोटो एडिटिंग आणि छोट्या जाहिराती बनवणे अशी बरीचशी कामे चांगली जमू लागले.
अपयशातून शिकलेला धडा
एके दिवशी राजूने गावातील एका शेतकऱ्याच्या दुकानासाठी छोटा पोस्टर तयार केला पण त्यात काही चुका झाल्या.तो राजूला म्हणाला हे बघ अशा कामाने मला नुकसान होईल.तुला नीट जमणार नसेल तर का करतोस ? राजूला वाईट वाटलं काही वेळा त्याला असं वाटायचं की सगळं सोडून द्यावं पण त्याने हार मानली नाही. तो रात्रभर बसून युट्यूब वरून संगणकाचा अभ्यास करत,जुनी पुस्तके वाचायचा आणि रोज स्वतःला सुधारत गेला.
Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं
राजूचे पहिले यश
एके दिवशी गावातील शिक्षकांनी राजूला विचारलं तू माझ्या शाळेचं छोटं लोगो डिझाईन करशील का? राजूने ते मनापासून बनवलं त्याने पैसे न घेता ती काम केली. शिक्षक राजूच काम बघून खूप खुश झाले आणि त्यांनी गावातील इतर शाळांना त्याची शिफारस केली , थोड्याच दिवसात त्याला अनेक काम मिळू लागली हळूहळू तो थोडे थोडे पैसे कमवू लागला.
अशाच छान गोष्टी वाचण्यसाठी येथे क्लिक करा
राजूची मोठी झेप
ज्याच्याकडे ना पैसा होता , ना ओळख होती ,त्या राजूने आपल्या मेहनतीने छोटे छोटे काम करत स्वतःच एक डिजिटल डिझाईन स्टुडिओ सुरु केलं. त्याच्या गावातील इतर मुलं जेव्हा नोकरी शोधत होती तेव्हा राजूने स्वतःचा रोजगार उभा केला होता .गावातले लोक ज्यांनी त्याला तू काही करू शकणार नाहीस असं म्हटलं होतं ते आता त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले होते. आजचा राजू हजारो लोकांना फ्रीलॅन्सिंग, डिजिटल मार्केटिंग आणि बरेच स्किल्स शिकवतो .
तो म्हणतो “यश मिळवण्यासाठी मोठ्या सुरुवातीची गरज नसते फक्त पहिलं पाऊल धैर्याने टाकायला लागतं.”राजू खूपच मोठा झाला.त्याची आई अभिमानाने गावात सांगते माझा मुलगा आज इतरांना रोजगार देतो. लोक एकेकाळी ज्याची थट्टा करत होते तोच आज त्यांच्यासाठी आदर्श आहे.
Inspirational Stories:One Small Step Can Change Life|प्रेरणादायी मराठी कथा – एक छोटं पाऊल जीवन बदलून टाकतं
शिकवण
लहान पाऊल मोठं यश आणू शकतं.
संधीची वाट बघण्यापेक्षा संधी निर्माण करा.
अपयश हे शेवट नसून शिकण्याची नवी संधी आहे.
हार मानली नाही तर मार्ग नेहमी सापडतो.