A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट ही गोड, शांत आणि मनाला उब देणारी मराठी bedtime story मुलांसाठी खास तयार केलेली आहे. दयाळूपणा, धैर्य आणि जादुई चांदण्याची शक्ती या कथेतून मुलांना प्रेम, करुणा आणि आत्मविश्वासाचं सुंदर धडे मिळतात.

४ ते १० वयोगटातील मुलांना झोपताना ऐकायला किंवा वाचायला ही कथा अगदी परफेक्ट — हलकीफुलकी, feel-good आणि स्वप्नांसारखी शांत.मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारी आणि मनाला समाधान देणारी ही चांदण्यामधील जादुई सफर तुम्हाला नक्कीच आवडेल.

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

शांत चांदणं आणि झोपलेलं गाव

शांत, थंड रात्रीच्या वाऱ्यात एक छोटंसं गाव गाढ झोपेत हरवून गेलं होतं. घरांच्या छतांवर चांदण्यांचं रुपेरी पांघरूण पसरलं होतं. त्या गावातच एक छोटी, गोड मुलगी राहत होती, तिचं नाव होतं आर्या. आर्या फारच संवेदनशील आणि प्रेमळ होती.

आर्या – चंद्राशी गप्पा मारणारी मुलगी

आर्याला चंद्र खूप आवडायचा. तिला त्याच्यासोबत बोलावसं वाटायचं म्हणून ती रोज झोपण्याआधी खिडकीत उभी राहून चंद्राकडे पाहायची आणि हळूच त्याच्याशी बोलायची, त्याच्यासोबत गप्पा मारत बसत.

रोजचा दिवस तिला कसा गेला आणि तिने काय काय केलं सगळं काही ती चंद्रासोबत बोलत बसत.“आज माझा दिवस छान गेला…”“आज शाळेत मला थोडं वाईट वाटलं…”तिला वाटायचं, चंद्र तिचं सगळं ऐकतो… तिचं सगळं समजून घेतो.

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

हरवलेला निळा ससा

पण त्या रात्री आर्याच्या डोळ्यांत आनंद नव्हता. ती अचानक रडायला लागली. कारण तिला तिची खेळणी खूप आवडायची. त्या खेळणीमधलं एक खेळणं म्हणजेच निळा छोटा ससा जो तिचा खूप आवडीचा आणि तोच हरवला होता.

ते तिचं फक्त खेळणं नव्हतं, तर तिचा मित्र होता.तिने घरभर शोधलं, कपाटाखाली पाहिलं, अंगणात पाहिलं… पण ससा कुठेच सापडला नाही. शेवटी तिने तिच्या आईला विचारलं, आई-वडिलांनीही खूप शोध घेतला, पण सगळं व्यर्थ.

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

चंद्राकडे केलेली विनंती

हळूच आर्या खिडकीजवळ आली. चंद्राकडे पाहत तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी चंद्राकडे पाहिलं आणि म्हणाली,“चंद्रा… तू इतका मोठा आहेस… तुला तर सगळं दिसतं ना? माझा ससा हरवला आहे. मला तो खूप आवडतो. तो माझा छान मित्र आहे. मला तो हवा आहे. तू सांगशील का मला माझा ससा कुठे आहे ते? मला शोधायला मदत कर…”तेवढ्यात चंद्र अधिकच उजळला.

रुपेरी पायवाटेची जादू

आणि अचानक—आर्याच्या खोलीत रुपेरी प्रकाशाची एक पायवाट तयार झाली. तिने ते पाहिलं आणि त्या पायवाटेवरून बाहेर जात होती, गावाच्या पलीकडे… झाडीत! आर्या थोडी घाबरली. पण त्या प्रकाशात एक उब होती, एक सुरक्षित भावना. तिने खोल श्वास घेतला आणि हळूच त्या पायवाटेवर पाऊल ठेवलं.

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

जंगलातील शांत प्रवास

ती चालत होती…तिला विचित्र आवाज ऐकू येत होते. पानांची सळसळ ऐकू येत होती,दूर कुठेतरी पक्ष्यांची कुजबुज,आणि सगळीकडे एक जादुई शांतता. पण तरीदेखील ती थांबली नाही चालत राहिली. थोडं पुढे गेल्यावर तिला एक छोटासा तारा दिसला—जणू जमिनीवर पडलेला! तो हसत तिला म्हणाला,“घाबरू नकोस आर्या. मी चंद्राचा मित्र आहे. तुझं खेळणं माझ्याकडे सुरक्षित आहे… आणि ते तुझीच वाट पाहत आहे.”आर्या त्याच्या मागे मागे गेली. तो तिला एका जुन्या, मोठ्या झाडाजवळ घेऊन गेला.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

एकटा प्राणी आणि हरवलेली मैत्री

झाडाखाली एक छोटंसं प्राणी बसलेलं होतं.त्याच्या हातात—आर्याचा निळा ससा!तो रडत होता.“हे माझं नाही…” तो म्हणाला,“माझ्याकडे कधीच खेळणं नव्हतं. मला वाटलं हा ससा माझा मित्र बनेल.”आर्याला राग आला नाही. ती त्याच्याजवळ बसली आणि तिने त्याला प्रेमाने विचारलं,“तू एकटाच राहतोस का?”तो हळूच मान हलवून म्हणाला,“हो… मला कोणीच नाही.”आर्याने त्याचा हात धरला.“मित्र मिळवायला खेळणं चोरायचं नसतं. फक्त प्रेमाने बोलायचं. चल आजपासून मी तुझी मैत्रीण आहे.”त्या शब्दांनी त्या प्राण्याचे डोळे चमकले. त्याने ससा परत दिला… आणि चंद्रप्रकाश अधिक तेजस्वी झाला.

Watch More On

A Magical Marathi Bedtime Story for Kids – चांदण्यांची पायवाट

आनंदी निरोप आणि घरी परत

आर्या आणि तो प्राणी दोघांनी वर पाहिलं. चंद्र हसत होता. दोघांनी चंद्राला हात हलवून निरोप दिला.तारा आर्याला परत घरापर्यंत सोडायला आला. रुपेरी पायवाट हळूहळू गायब झाली. आर्या आपल्या बेडवर झोपली. ससा तिच्या जवळ होता…आणि मनात एक नवीन, गोड मैत्री. त्या रात्री तिला खूप शांत, सुंदर झोप लागली.

अशाच Bedtime Stories वाचण्यसाठी येथे क्लिक करा

शिकवण

• खरे मित्र चोरून नाही, तर प्रेमाने मिळतात.

• छोटी दयाळुता मोठ्या मैत्रीत बदलू शकते.

• धैर्य आणि करुणा नेहमी जादू घडवतात.

Leave a Comment