A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा ही मराठी प्रेमकथा दोन साध्या माणसांच्या आयुष्यातल्या भावनिक क्षणांवर आधारित आहे.“प्रेमाचा शेवट नव्हे, नव्या सुरुवातीची कथा” ही एक अशी गोष्ट आहे जी सांगते , खरं प्रेम कधी हरवत नाही, ते फक्त रुप बदलतं.वाचा ही सुंदर मराठी Love Story जी हृदयाला स्पर्शून जाईल.

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

बालमैत्रीचं सुंदर नातं

कोकणातील एका छोट्या गावात आर्या आणि सिद्धार्थ लहानपणापासून एकत्र वाढले. दोघं शाळेत एकत्र जायचे ,नेहमी सोबत असायचे. एकत्र अभ्यास, खेळणं असायचं. कधी कधी भांडत असायची पण त्यांची भांडण थोडाच वेळापुरती लगेच त्यांच्यात हसणं होत असत. आर्या नेहमी म्हणायची, सिद्धार्थशिवाय माझं जग अपूर्ण आहे. त्या वेळेस कुणालाही कळलं नव्हतं की ही बालमैत्रीचं रूप कधी खरं प्रेम बनेल.

कॉलेजचं आयुष्य आणि अंतराचं आगमन

शाळा संपल्यानंतर सिद्धार्थ पुण्यात इंजिनिअरिंग शिकायला गेला, तर आर्या गावातच बी.ए. करत राहिली. दोघांची खूप दिवस भेटच नाही त्यांच्या भेटीत अंतर वाढलं, पण नात्यातली भावना अधिक घट्ट झाली. रोजचे Good Morning आणि Take Care मेसेजेसच त्यांच्या जगाचा आधार बनले होते. त्यांचं प्रेम निष्पाप, शांत आणि हळूहळू फुलणारं होतं.

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय

बरेच दिवस दोघांची भेट नाही. सिद्धार्थला खूप आठवण यायला लागली , त्याच्या मनात तिच्यसाठी प्रेमाची भावना होती. एकदा असच निवांत बसलेला असताना संध्याकाळी सिद्धार्थने ठरवलं आता नाही सांगितलं तर कधीच नाही सांगू शकणार. मला आर्याला सांगायचं आहे की मी तिच्यावर प्रेम करतो. त्याने तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलं आणि गावाला जायची तयारी केली. पण नशिबात काहीतरी वेगळं होत.

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

अनपेक्षित बातमी

गावाला आल्यावर त्याला कधी तिला भेटतो असं झाल पण त्याला कळत ते वेगळच. आर्याचं लग्न ठरतं. त्याच रात्री आर्याचा मेसेज आला. सिद्धार्थ, बाबा माझं लग्न ठरवतायत. मला काय करावं ते समजत नाही. तो मेसेज वाचून सिद्धार्थचा आवाजच गेला. त्याच्या मनात हजार प्रश्न “का इतकं उशिरा कळलं? मी काय करु? त्याने ठरवलं, तीचं सुख जर खरं असेल, तर मला तिला मुक्त करावं लागेल.

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

भावनिक भेट – प्रेमाचा निरोप

सिद्धार्थ गावात आला. त्या दोघांनी ठरवलं की जुन्या बागेत भेटायचं – जिथे लहानपणी झोपाळ्यावर बसून स्वप्नं रंगवायचे. आर्याच्या डोळ्यांत पाणी होतं. ती म्हणाली, मी नाही ठरवलं हे लग्न… पण विरोध करण्याचं धैर्यही नाही. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, आर्या, मला तुझं सुख हवं असं नेहमीच वाटतं… तू खुश राहिली पाहिजेस. मी नाही मागणार तुला, पण वचन दे — स्वतःला हरवू नकोस.

आर्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडली आणि म्हणाली, तू माझा आधार आहेस, आणि तसाच राहशील. त्या दिवसानंतर सिद्धार्थने तिच्यासाठी एक डायरी दिली, ज्यात एकच वाक्य लिहिलं होतं: आपण एकत्र नसू शकतो, पण मी तुला नेहमी शुभेच्छा देत राहीन.

अजून येथे वाचा

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

वर्षांनंतरची भेट–भावनिक पुनर्मिलन

काही वर्षांनंतर आर्या मुंबईत settled झाली होती, आणि सिद्धार्थ स्वतःचं start-up चालवत होता. एका पुरस्कार वितरण सोहळ्यात दोघं पुन्हा भेटले. आर्या आता एका छोट्या मुलाची आई होती, तर सिद्धार्थ अजून single होता — पण त्याच्या डोळ्यांत शांतता होती.

तो विचारतो, आयुष्य कसं चाललंय? ती हलकंसं हसून म्हणाली, शांत आहे… पण अजूनही तू दिलेली डायरी माझ्या टेबलावर आहे. त्या क्षणी दोघांनी जाणलं — काही नाती शेवटीही संपत नाहीत; ती आठवणीत कायम जिवंत राहतात.

Watch More On

प्रेमाचं खरं रूप

त्या भेटीनंतर सिद्धार्थने स्वतःशी म्हटलं, काही शेवट हे खरं तर नवी सुरुवात असते. त्याने भूतकाळाला स्मित देत भविष्याकडे चालायला सुरुवात केली. आर्या आणि सिद्धार्थ दोघंही आपापल्या मार्गांनी पुढे गेले, पण एकमेकांसाठी मनातल्या कोपऱ्यात सदैव आदर, प्रेम आणि शांत आठवण ठेवली.

A Heart Touching Marathi Love Story | प्रेमाचा शेवट नव्हे नव्या सुरुवातीची कथा

शिकवण

खरं प्रेम म्हणजे मालकी नव्हे, तर आदर आणि त्याग. कधी कधी आपण ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो, त्याला दूर जाऊ देणं हेच त्याचं खरं सुख असतं. प्रेमाचा शेवट म्हणजे हरवणं नव्हे, तो फक्त नव्या रूपात पुन्हा जन्म घेतो.

Leave a Comment