1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा ही कथा आहे पराक्रमी पण विनम्र हनुमानाची. “हनुमानाची विनम्रता” ही पौराणिक मराठी कथा आपल्याला शिकवते की खरी ताकद नम्रतेत असते. वाचा ही प्रेरणादायी कथा आणि जाणून घ्या हनुमानाच्या विनम्रतेत दडलेलं गूढ..

Table of Contents

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

हनुमानाची विनम्रता

हनुमानाची विनम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे त्यांच्या ऑफर शक्ति बुद्धिमत्ता आणि भक्तीच्या जोडीला विशेष अर्थ देते त्यांचे विनम्रता अनेक उदाहरणांवरून दिसून येते जी केवळ त्यांच्या स्वामी श्री रामांप्रतीच नाही तर इतरांप्रतीही आहे.

रामायणातील अनेक प्रसंग आपल्याला हनुमानाच्या पराक्रमाची आठवण करून देतात. पण एक प्रसंग असा आहे जो त्यांच्या विनम्रतेची खरी ओळख करून देतो.

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

श्रीरामाचा आशीर्वाद

लंकेवर विजय मिळवून श्रीराम अयोध्येला परतले. संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली होती. रामाने सर्वांना सन्मान दिला. लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण, अंगद… पण सर्वांच्या डोळ्यांत एकच नाव होतं – “हनुमान” राम स्वतः म्हणाले, जर हनुमान नसता तर सीतेचा शोध कधीच लागला नसता.

लंकेचा पराभव हनुमानाच्या धैर्यामुळेच शक्य झाला. हनुमान मात्र शांत होते. त्यांनी डोळे खाली केले आणि म्हणाले, प्रभू, मी काही केलं नाही. सगळं आपल्या कृपेनेच झालं. राम हसले आणि म्हणाले, हनुमान, तुझं हे वाक्यच तुझी महानता दाखवतं.

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

अहंकाराचा अभाव

प्रचंड शक्तिशाली असूनही हनुमानाला कधीही अहंकार झाला नाही ते नेहमीच आपल्या सर्व यशाचे श्रेय भगवान रामाला देत असत आणि स्वतःला केवळ त्यांचा एक सेवक मानत. महाभारताच्या काळात एकदा भीमाला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता.

पांडवांच्या वनवासादरम्यान भीम एका ठिकाणी थांबला असता त्याला एक वृद्ध वानर दिसले. भीम त्याला त्याची शेपटी बाजूला करायला सांगतो. परंतु वानर त्याला ते करण्यास सांगतो. भीमाने शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ती हलवता आली नाही. तेव्हा त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याला समजले की तो वानर नसून हनुमान आहे. अशाप्रकारे हनुमानाने आपली शक्ती न दाखवता भिमाचा अहंकार दूर केला.

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

समर्पणाची भावना

हनुमानाची संपूर्ण भक्ती आणि सेवाभाव हा श्रीरामांच्या चरणी समर्पित होता. ते कोणतेही काम स्वतःच्या फायद्यासाठी करत नव्हते, तर केवळ आपल्या स्वामींच्या इच्छेनुसार करत होते. त्यांचे हे निस्वार्थ समर्पण त्यांच्या विनम्रतेचे एक उत्तम उदाहरण आहे.

देवता परीक्षेला येतात

एक दिवस देवता विचार करू लागल्या की, हनुमान इतका विनम्र कसा राहतो? जगभर त्याचं नाव आहे, पण त्याला गर्व नाही? इंद्र, वरुण आणि वायू यांनी ठरवलं की हनुमानाची परीक्षा घ्यायची. ते ब्राह्मणाचे रूप घेऊन आले आणि म्हणाले, हनुमान, आम्ही तुझ्या पराक्रमाबद्दल ऐकलं आहे. म्हणून आम्हाला तुझं दर्शन घ्यायचं होतं. हनुमान नम्रतेने म्हणाले, मी तर फक्त प्रभू श्रीरामाचा दास आहे. माझ्यात काहीच विशेष नाही.

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

परीक्षा सुरू होते

ब्राह्मण म्हणाले, जर तुझ्यात काही नाही, तर आम्हाला दाखव की तू खरोखर नम्र आहेस. तेव्हाच त्यांनी जादूने हनुमानासमोर एक मोठा पर्वत उभा केला. ते म्हणाले, हा पर्वत हलवू शकशील का? हनुमान थोडंसं स्मित करत म्हणाले, मी नाही हलवू शकत, पण रामाचं नाव घेतलं तर नक्कीच होईल.” “जय श्रीराम!” असा जयघोष करून हनुमानाने पर्वत उचलला. देवता थक्क झाल्या.

Watch More On

हनुमानाची नम्रता

हनुमान म्हणाले, हे माझं नाही, प्रभूच्या नावाचं सामर्थ्य आहे. तेव्हाच देवांनी आपलं खरं रूप दाखवलं. इंद्र म्हणाले, हनुमान, आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, पण आज आम्ही शिकतो आहोत — खरी ताकद नम्रतेत असते. हनुमान नम्रतेने हात जोडून म्हणाले, देवांनो, मला गर्व नाही, कारण गर्व म्हणजे रामाचं विस्मरण. आणि मी रामाचं नाव विसरू शकत नाही.

1 Inspiring Marathi Pauranik Story Hanumanachi Vinamrata | हनुमानाची विनम्रता एक प्रेरणादायी पौराणिक कथा

शेवट – विनम्रतेचा तेज

देवतांनी हनुमानाला आशीर्वाद दिला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. त्या दिवसानंतर “हनुमानाची विनम्रता” ही कथा स्वर्गलोकातसुद्धा गाजू लागली.

अजून येथे वाचा

शिकवण

खरा पराक्रम तोच जो नम्रतेने सजलेला असतो. जे स्वतःला सर्वात लहान समजतात, तेच खरं तर सर्वात मोठं कार्य करतात.

Leave a Comment