1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये एक नवीन गोष्ट घेऊन आलेला आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत की गरीब शेतकरी कसा बनला गावाचा हिरो जिद्द, संघर्ष आणि मेहनतीने नशीब कसं बदलता येतं याची प्रेरणादायी कथा वाचा. गरीब शेतकरी शंकर कसा गावाचा हिरो बनला आणि यशाचा खरा अर्थ कसा समजला ते जाणून घ्या.

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

एक धनगाव नावाचे गाव होते. त्या लहानशा गावात शंकर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं कुटुंब अगदी साधं पण समाधानाने राहत.

त्याच्यासोबत त्याची बायको गंगा आणि दोन लेकरं – मंगेश आणि सावित्री – हेच त्याचं जग होतं. एका छोट्या झोपडीत राहत असूनही त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्नं होती, त्यांना खूप काही कराव अस वाटत आणि मेहनतीवर विश्वास होता.

पहिली मोठी आशा

त्या वर्षी शंकरने कर्ज काढलं आणि शेती केली होती. आणि त्या वर्षी पाऊस पण छान झाला , वेळेवर पडला आणि त्याच्या शेतातील पिकं चांगलीच बहरली. त्या सगळ्यांना खूपच आनंद झाला. सगळ्यांच्या जीवात जीव आला. आता काही काळजी नाही असं शंकर म्हणाला.

गंगा, या वेळी देवाने आपली प्रार्थना ऐकली, शंकर हसून म्हणाला.

मंगेश बाबांकडे धावत जातो आणि उत्साहाने विचारतो, बाबा, या वेळी मला शाळेत जायला मिळेल का? मला जायचं आहे शाळेत. मला जाऊ द्याल ना बाबा ?

त्यावर शंकर म्हणतो.,

हो रे बाळा, तुझ्यासाठी नवीन कपडे आणि  नवीन पुस्तके आणीन, मग तु जा शाळेत आणि छान अभ्यास कर. शंकर आनंदाने म्हणाला.

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

आशेवर पाणी फिरलं

पण नियतीला काही हे सुख जास्त काळ झेपलं नाही. रात्री अचानक आकाश काळं झालं, वीजा कडकडू लागल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. काही तासांतच सगळं शेत पाण्याखाली गेलं. सगळीकडे पाणी पाणी झालं. सगळी नुकसान झाली.

दुसऱ्या दिवशी सरपंचाने शंकरला सांगितलं,

शंकर, कर्ज फेडू शकला नाहीस म्हणून तुझं शेत आता गावाच्या समितीकडे आहे.

शंकरचे डोळे भरून आले. त्याची मेहनत आणि आशा पाण्यात गेली होती.

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

गाव सोडण्याचा निर्णय

गंगा अश्रूंनी म्हणाली,

शंकर, या गावात आपल्यासाठी आता काहीच उरलं नाही. चला, दुसरीकडे नवा संसार सुरू करू.

शंकरने होकार दिला आणि लेकरांना घेऊन गाव सोडून निघाले. जंगलातून जाताना त्यांना पडक्या मंदिराजवळ एक छोटी झोपडी सापडली.

संघर्षाची नवी सुरुवात

शंकर रोज जंगलात जाऊन लाकूड कापायचा आणि बाजारात विकायचा. थोडे पैसे मिळाले की गंगा घरासाठी धान्य आणायची. संसार पुन्हा सुरू झाला होता, पण संघर्ष अजूनही संपला नव्हता.

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

गुहा आणि देवाचा आशीर्वाद

एका दिवशी शंकर जंगलाच्या आत गेला आणि त्याला एक जुनी गुहा दिसली. आत एक सोनेरी मूर्ती आणि बाजूला एक दिव्य व्यक्ती बसलेली होती.

कोण आहेस बाळा? त्यांनी विचारलं.

शंकरने त्याची कहाणी सांगितली.

दिव्य व्यक्तीने हसत त्याला एक सोनेरी माळ दिली आणि म्हणाले,

तुझ्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला हा आशीर्वाद आहे. याचा योग्य उपयोग कर.

Watch More On 

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

नवीन जीवनाची सुरुवात

शंकरने ती माळ विकली आणि जे पैसे मिळाले त्यातून पुन्हा जमीन घेतली. कर्ज फेडलं आणि शेती सुरू केली. या वेळी त्याने जास्त मेहनत केली आणि भरपूर पीक आले.

गावाचा हिरो बनला

शंकरने फक्त स्वतःचा संसार नाही उभा केला, तर इतर गरीब शेतकऱ्यांनाही मदत केली. गावात त्याचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं.

शंकरभाऊ, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात, गावकरी म्हणत.

शंकर हसून म्हणायचा,

जिद्द आणि मेहनत असेल तर नशीब पुन्हा लिहिता येतं.

अजून येथे वाचा

1 Powerful Story of Struggle & Triumph – How a Poor Farmer Became a Hero | जिद्दीची एक अद्भुत कथा

शिकवण

• संकटं आली तरी हार मानू नये.

• जिद्द आणि मेहनतीने कोणतीही परिस्थिती बदलता येते.

• यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर इतरांना मदत करणे हेही खरं यश आहे.

Leave a Comment