3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह नमस्कार मित्रांनो आज आपण तिरसट सुरवंट, मनीमाऊचे वाईट स्वप्न आणि बढाईखोर बेडूक या ३ सुंदर बालकथा येथे वाचा. मुलांसाठी प्रेरणादायी गोष्टी, ज्यातून शिकायला मिळतील बदल, संयम, नम्रता आणि शहाणपणाचे धडे.चला तर मग वाचूया आजची गोष्ट.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
तिरसट सुरवंट
एका हिरव्यागार नाजूक वेलीवर एक तिरसट सुरवंट राहत होता. त्या नाजूक वेलीवर असलेली रसदार पानं तो दिवसभर खाऊन फस्त करायचा. जर त्या वेलीवर दुसरा कोणी सुरवंट आला तर त्याला ते अजिबात आवडायचं नाही. तो त्याच्याकडे रागाने बघत असे.
एकदा काय झालं एक छान काळया ठिपक्याचं पांढरंशुभ्र फुलपाखरू त्या वेलीवर उडत उडत आल. ज्या हिरव्यागार पानावर सुरवंट निवांत बसला होता, त्याच पानावर ते फुलपाखरू आपली अंडी घालण्यासाठी बसलं होतं. सुरवंट त्याच्याकडे रागाने बघत त्याला म्हणाला , तू इथं माझ्या या पानावर तुझी अंडी घालू नकोस!
फुलपाखरू सुरवंटाकडे बघून नुसतं हसलं. त्याने त्याच पानावर आपली अंडी ओळीनं घातली. जणू छोट्या छोट्या मण्यांची माळ. मी बघतोच आता कशी करायची याच्यातून आपली सुटका. त्याची सारखी कुरबुर सुरू होती. त्याला आपल्याजवळ कोणी म्हणजे कोणीच नको होतं.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
एके दिवशी सुरवंटाला खूप झोप येऊ लागली. सुरवंटाने मुलायम रेशीम कशाचा बिछाना तयार केला. त्याला झुल्यासारखं पानावर गुंफला आणि त्या मऊ मुलायम कोशात तो गाढ झोपी गेला. झोपाळू सुरवंटाने किती झोपावं बरं? तो चक्क तीन आठवडे झोपून राहीला.
तीन आठवड्यानंतर तो गाढ झोपेतून जागा झाला. त्याने स्वतःभोवती गुंफलेल्या बहु मुलायम रेशीम कोशाचा बिछाना चावून चावून खाऊन टाकला. रेशीम कोशातून तो बाहेर आला आणि बघतो ते काय अद्भुत आश्चर्य ! कुरूप सुरवंटाचे सुंदर काळ्या ठिपक्यांच पांढरशुभ्र फुलपाखरू! नवं, सुंदर, देखण्या रूपात त्याचे रूपांतर झालं होतं.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
त्याला त्या क्षणी तो क्षण आठवला, जेव्हा आपल्याकडे हसत लुकलुकणाऱ्या डोळ्यानं कौतुकानं बघणारं, मी नाही म्हणत असतानाही माझ्या पानांवर अंडी घालणार , काळ्या काळ्या ठिपक्यांचं पांढरशुभ्र फुलपाखरू दुसरं कोणी नसून ती माझी आईच होती. त्या सुरवंटाला खूप आनंद झाला. पण त्याला वाईट देखील वाटले की आपण तिच्याशी मूर्खासारखे वागलो. आपण आपल्या आईला ओळखू शकलो नाही.त्याचं सुरवंटाला खूप खूप वाईट वाटलं.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
वाईट स्वप्न
एका आजोबांच्या घरात एक मनीमाऊ राहत होती. त्या मनीमाऊची एक फार वाईट खोड होती. ती चोरून ,आजोबांचा डोळा चुकवून स्वयंपाकघरात धाड टाकीत असे. स्वयंपाकघरात ठेवलेले दूध,मासे,चीज,लोणी मनीला भूक असो किंवा नसो क्षणात गट्टम करत असे.
एकदा काय झालं मांजरीने एवढं खाल्लं की तिची ढेरी टमाटम फुगली. तिला हलता येईना, चालता येईना, श्वासही घेता येईना. तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. पोटात त्रास होऊ लागला. तिला झोपही येईना. या कुशीवरून त्या कुशीवर अन त्या कुशीवरून या कुशीवर. मांजर घाबरु लागली. तिला आपल्याला काय होतंय तेच कळेना. पोटात तिला त्रास होऊ लागला.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
हळूहळू काहीवेळाने तिला थोडी डुलकी लागली. थोडा वेळ झाला अन् तिला स्वप्नात आजोबांचा भयानक टायगर कुत्रा दिसला. तो तिच्यावर दात विचकावीत रागात भुंकतो आहे.
थांब, आता तुला कशी मज्जा दाखिवतो मी, असं म्हणून मांजरीचा पाठलाग करतो आहे. स्वयंपाक घरातून मनी मांजरीला पळवून लावण्यासाठी तो तिच्यावर रागाने झेप घेतो आहे. असं स्वप्न पाहून मांजरीची छाती धडधडू लागली.
एवढी सगळी अद्दल घडून देखील मांजर दुसऱ्या दिवशी स्वयंपाक घरात हजर झाली. नेहमीप्रमाणे हावरट मनी पोटात जागा नसतानाही खा..खा.. खाऊ लागली. त्या रात्रीही तिला पुन्हा वाईट स्वप्न पडलं. आधी पडलं होतं तसंच त्या भयंकर टायगरचं.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
दुसरा दिवस उजाडला. हावरट मांजर आपल्या नेहमीच्या खादाड सवयीने सकाळी सकाळी स्वयंपाक घरात घुसणार तेवढ्यात मांजरीला टायगर कुत्रा स्वयंपाकघराच्या दारात राखण करत असलेला दिसला. टायगर समोर असताना स्वयंपाकघरात जाऊन मलाईदार दूध,ताजी मासे, लोणी, केक यावर ताव मारायची तिची काय मजल?
मनीमाऊ मनात म्हणाली, जाऊ दे,आज मलाईदार दूध, ताजे मासे, लोणी, केक नाही तर नाही. दुसरं काहीही जे मिळेल ते खायचं आणि गप्प बसायचं. त्या रात्री मात्र मनीमाऊला गाढ झोप लागली. तिला आज झोपेत स्वप्नही नाही पडलं त्या रागीट टायगरचं. त्या दिवसापासून मनीमाऊनी ठरवले यापुढे कधीही हावरटासारखं चोरून पोटभरेपर्यंत खायचं नाही.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
बढाईखोर बेडूक
एका उथळ विहिरीत एक बेडूक राहत होता.तो एका कासवाशी फार मोठया गप्पा मारत होता. कासव हा विशाल खोल निळ्याशार समुद्रात राहत होता. या बढाईखोर बेडकाला विशाल समुद्र माहितच नव्हता. म्हणून तो आपल्या उथळ विहिरीच्या उथळ गप्पा कासवाला सांगत होता.
आमच्या विहिरीत मनात येईल तशा मनसोक्त उड्या मारता येतात. मी जेव्हा विहिरीच्या पाण्यात उडी मारतो तेव्हा विहिरीतील पाणी उसळी घेऊन वर येतं. मी आमच्या विहिरीत पाणी उडवीत मस्त पोहतो. विहिरीतल्या पाण्यात इतर कीटक, बेडूक पिल्लं या विहिरीत राहतात; पण माझ्याशी त्यांची तुलनाही अगदी अशक्य आहे. कारण मी या विहिरीतला राजा आहे. माझी विहीर मला खूप आवडते.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
विहिरीचं वर्णन ऐकून कासव विहिरीजवळ आलं. विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी त्याने विहिरीत वाकून आत पाहिलं. कासव विहिरीत उतरलं; पण कासवाचे पाय चिखलात रुतून बसले.
मूर्ख बेडकाच्या अज्ञानाची कासवाला कीव करावीशी वाटली. तो बेडकाला म्हणाला, अरे, बेडूक , तू कधी विशाल आणि खोल समुद्र पाहिला नाही वाटत. म्हणून तू त्या विशाल समुद्राची कल्पनाच करू शकत नाही.
3 inspiring Marathi stories | ३ सुंदर गोष्टी – बदल, संयम आणि शहाणपण शिकवणारे बालकथा संग्रह
समुद्र प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे. समुद्राच्या महाकाय लाटा या भल्याभल्या प्राण्यांना गिळून टाकतात. समुद्र कधीही आटत नाही. समुद्र आपल्या पोटात छोट्या-मोठ्या सगळ्या जलचरांना सामावून घेतो.
त्याचं पोट म्हणजे मोठा जादूचा खजिना आहे. समुद्रात राहणं म्हणजे उत्साह आणि आनंदाला भरती येणं. समुद्राचं हे वर्णन ऐकून बढाईखोर बेडकाला आपल्या उथळ विहिरीच्या उथळ दलदलीत जगणं कसं उथळ असतं हे कळलं.