5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन आलो आहोत एक नवीन गोष्ट जी पौराणिक कथा यावर आधारित आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता बाप्पा म्हणजेच आपला गणपती बाप्पा यांची आज आपण गोष्ट येथे वाचणार आहोत.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

गणपती बाप्पा अडथळे दूर करणारा,बुद्धीची आणि समृद्धीची देवता मानली जाते. त्यांच्या जीवनातील अनेक कथा प्रेरणादायक आहेत. या कथांमध्ये गणपतीचा जन्म, चंद्राला दिलेला शाप तसेच त्यांच्या बुद्धीची परीक्षा अशा कथांचा समावेश आहे.

या कथांमधून नम्रता,बुद्धीचा योग्य वापर आणि आपल्या पूर्वजांचा आदर यासारखे धडे मिळतात. गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते मोदक, गोजिरं रूप, मोठं पोट आणि मोठे मोठे सूपाएवढे कान.

आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात “श्री गणेशाय नमः” अशा मंत्रानेच केली जाते.म्हणूनच गणपतीला प्रथम पूज्य, विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हटलं जातं. गणेशाच्या कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर त्यातून आपल्याला श्रद्धा, संयम आणि जीवनाचे तत्त्वज्ञान शिकायला मिळते.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

गणपती बाप्पा कोण आहेत?

गणपती बाप्पा किंवा गजानन म्हणूनही ओळखले जातात ते भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वती माता यांचे पुत्र आहेत. त्यांचे हत्तीएवढे डोके, मोठे कान आणि पोट यावरून ते सहज ओळखले जातात.

गणेश हा शब्द संस्कृत मधून आला आहे “गण म्हणजे समूह किंवा लोक आणि ईशा म्हणजे प्रभू शिवाच्या अनुयायांचा नेता” म्हणून त्यांची भूमिका दर्शवते. प्रत्येक पूजाविधीमध्ये गणेशाचे प्रथम आवाहन केले जाते. यामुळे शुभ सुरुवात आणि आव्हाने दूर करणारे म्हणून त्यांचे स्थान अधोरेखित आहे.

गणेशाचा जन्म – आईच्या आज्ञेवर ठाम

गणेशाच्या जन्माची कहाणी प्रेरणादायक आहे.एके दिवशी देवी पार्वती माता स्नान करण्यास गेली. त्यांनी आपल्या अंगाला चंदन लावले आणि आपल्या अंगावरील चंदनाच्या उटण्याच्या लेपापासून एक सुंदर बालक घडवलं.

तिने त्या बालकाला आज्ञा दिली की ‘मी स्नानगृहात स्नान करण्यास जात आहे.इथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोस’असे सांगून माता पार्वती स्नान करण्यास आत निघून गेली.

थोड्याचवेळाने तेथे शंकर भगवान आले.त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला.ते आत जाताना पाहून दरवाजाजवळ थांबलेल्या गणेशाने त्यांना रोखले. तूम्ही आत स्नानगृहात जाऊ शकत नाही.आमची माता आत आंघोळ करत आहे.तिने आम्हाला स्पष्ट सांगितल आहे की आत कोणालाही येऊ देऊ नकोस.ते ऐकून भगवान शंकरानी त्या लहान बालकाला सांगितले की मी माता पार्वतीचा पती आहे मला आत जाऊ दे.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीच महत्वाचे नव्हते. त्याने भगवान शंकराची वाट रोखून धरली.आपला असा अपमान करतो हे पाहून भगवान शंकरांचा खूपच संताप झाला. शंकरांनी त्रिशुळाने त्याचं मस्तक छाटलं.आणि ते आत स्नानगृहात गेले.त्यांना आत आलेले पाहून माता पार्वती खूपच संतापली.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

ती भगवान शंकराना म्हणाली,मी दरवाजाशी एका बालकास उभे केले होते आणि आत कोणालाही पाठवू नकोस असे देखील बजावले होते .’ ते ऐकून भगवान शंकर म्हणाले, त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आत येऊ देत नव्हता.त्यामुळे मी त्याचे शीर धडापासून वेगळे केले आहे.हे ऐकून माता पार्वतीला खूपच राग आला.तिने रौद्र रूप धारण केले.

तिने भगवान शंकरांना आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले नाहीतर मी बाहेर येणार नाही.तिची समजूत घालण्यासाठी सर्व देव आले.भगवान शिव तिला समजावत होते.पण तिने कोणाचेही ऐकले नाही.तिचा एकच अट्टहास होता की पुत्राला जिवंत करा.आईच्या आर्त हाका ऐकून शंकरांनी विष्णूंकडे अशा मुलाचे शीर घेऊन यायला सांगितले ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल.

भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला.मुलाचे शीर शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी पालथी घातली.पण त्यांना कोणाचेच शीर सापडले नाही.शेवटी त्यांना एक हत्तीण दिसली जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

त्या पिल्लाचे शीर गरुडाने विष्णूंकडे दिले.विष्णूंनी ते महादेवाकडे दिले.आपल्या शक्तीने त्यांनी त्या बालकास हत्तीचे शीर लावून जिवंत केले.त्याच दिवसापासून गणेशाला गजानन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

गणपतीला सर्व देव देवतांचा आणि लोकांचा ‘गण’ मानले गेले.त्याला पाहून पार्वती माता शांत झाली.आणि त्याचदिवशी त्या लाडक्या बाळाला आशीर्वाद देण्यात आले.

कोणत्याही शुभकार्याची सुरवात करण्यापूर्वी तुझे नाव अग्रस्थानी असेल. कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी तुझी पूजा करण्याचा मान असेल.म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या पूजनेच होते.

शिकवण – आई-वडिलांच्या आज्ञेत राहणं हेच सर्वात मोठं कर्तव्य

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

गणेश एकदंत का झाले?

गणेश पुराणानुसार एकदा ऋषी परशुराम कैलास पर्वतावर भगवान शिव यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यावेळी भगवान शिव तपश्चर्या करण्यात लीन झाले होते.म्हणून भगवान गणेश यांनी परशुरामांना भगवान शिवाला भेटण्यासाठी अडवले. परशुरामांचा खूप संताप झाला.

भगवान गणेश आणि परशुराम यांच्या तीव्र युद्ध सुरू झाले.या युद्धा दरम्यान परशुरामांच्या प्रहारमुळे भगवान गणेश यांचा एक दात तुटला.वेदनेने भगवान गणेश विव्हळू लागले.

गणपतीचे दुःख पाहून पार्वती माता ऋषी परशुराम त्यांच्यावर कोपली. नंतर ऋषी परशुरामांनी देवी पार्वती मातेची क्षमा मागितली आणि आणि बाप्पाला त्यांची शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान दिले.

गणेश रागावले नाहीत. उलट नम्रतेने त्यांना वंदन केलं.

त्यामुळे त्यांना ‘एकदंत ‘ म्हटलं जातं.

शिकवण – आपल्यावर अन्याय झाला तरी संयम ठेवणं हेच योग्य आहे. क्षमा करणं हाच खरा शौर्याचा मार्ग आहे.

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

गणेश आणि चंद्र

भगवान गणेश आणि चंद्राला दिलेला शाप ही कथा पौराणिक कथांमध्ये लोकप्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाने एकदा त्याच्या भक्तांनी त्याला अर्पण केलेले मोदक भरपूर प्रमाणात खाल्ले.खाऊन झाल्यावर भगवान गणेश आपल्या उंदरावर बसले आणि निघाले.बाहेर स्वारीला निघाले असताना त्यांना आकाशात चंद्र भेटला.

चंद्र खोडकर असल्याने, भगवान गणेशाच्या गोलाकार रूपावर हसला, ज्यामुळे भगवान गणेश क्रोधित झाले. भगवान गणेशाने चंद्राला त्याची चूक लक्षात आणून देण्याचे ठरवले आणि त्याच्या पोटावर हात ठेवला, ज्यामुळे तो फुटेपर्यंत मोठा होत गेला.

चंद्राने भगवान गणेशाकडे क्षमा करण्याची विनंती केली. भगवान गणेशाने ते मान्य केले, परंतु एका अट घातली की चंद्राने कधीही कोणाच्याही शारीरिक स्वरूपाची चेष्टा करू नये. चंद्राने ही अट मान्य केली आणि भगवान गणेशाची पुन्हा माफी मागितली.

चंद्राच्या वागण्यात मात्र काही फरक पडला नाही आणि त्याने परत एकदा गणेशाच्या दर्शनाची खिल्ली उडवली. यावेळी भगवान गणेश संतापले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की, “भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो तुला पाहील त्याला संकट येईल.”

म्हणून आजही त्या दिवशी चंद्र पाहायचा नाही, अशी प्रथा आहे.

शिकवण – इतरांचा उपहास करू नये. प्रत्येकाचा आदर ठेवावा.

अशाच छान गोष्टी वाचण्यसाठी येथे क्लिक करा

5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

प्रथम पूज्य गणेश

देवांनी एकदा स्पर्धा ठेवली – “विश्वाची तीन प्रदक्षिणा करणारा देव प्रथम पूज्य मानला जाईल.”

सर्व देव आपल्या वाहनावरून विश्वाची प्रदक्षिणा घ्यायला निघाले. पण गणेश मात्र शांतपणे आपल्या आई-वडिलांची प्रदक्षिणा करून म्हणाले –

“माझ्यासाठी आई-वडीलच हे विश्व आहेत.”

त्यामुळे गणपती प्रथम पूज्य ठरले.

शिकवण – पालकांची सेवा आणि त्यांचा सन्मान हीच खरी पूजा आहे.

गणेश आणि व्यासमुनी 5 Inspiring Stories of Lord Ganesha Marathi | गणपतीच्या 5 कथा मराठी

महाभारत लिहिताना व्यासमुनींनी गणेशाला लेखक बनवलं.

अट होती – गणेश थांबणार नाहीत आणि व्यासही थांबणार नाहीत.

गणेशाने प्रचंड वेगाने महाभारत लिहिलं.

शिकवण – एकाग्रता, संयम आणि ज्ञानानेच मोठं कार्य साध्य होतं.

Watch More On

निष्कर्ष :

गणपतीच्या या कथा केवळ पुराणातील गोष्टी नाहीत, तर जीवनाचं मार्गदर्शन करणाऱ्या शिकवणी आहेत.

आई-वडिलांचा सन्मान, संयम, क्षमा, नम्रता आणि भक्तीभाव – हेच गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात.

आज आपण वृद्ध झालो असलो तरी या कथांमधून मनाला समाधान, शांतता आणि श्रद्धेचं बळ मिळतं.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!

 

 

Leave a Comment