Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा प्रह्लादाची भक्ती ही अढळ श्रद्धा, धैर्य आणि देवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणादायी पौराणिक कथा आहे. मुलांसाठी उत्तम faith bedtime story.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
1. हिरण्यकश्यपूचा अहंकार
पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली असुर राजा होता. त्याने कठोर तप करून देवाला प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वरदान मिळवलं की त्याला माणसांकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. ब्रह्मांनी तथास्तू म्हणत त्याला वर दिले.
या वरदानामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला. त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला. त्याच्यासमोर कुणीही देवाचं नाव घेतलेलं त्याला सहन होत नसत. त्याने स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली आणि सर्वांना त्याचीच पूजा करण्याचा आदेश दिला.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
2. भक्त प्रह्लाद
हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रह्लाद मात्र वेगळाच होता. तो लहानपणापासून भगवान विष्णूचा भक्त होता. तो सतत देवाचं नाव घेत असत. प्रल्हाद नेहमी नारायण नारायण असा जप करत असे. वडिलांना त्यांचे जप करणं सहन होत नसे.
त्याच्या मनात श्रद्धा, शांतता आणि प्रेम होतं. वडिलांनी अनेकदा समजावून सांगितलं तरी त्यांचा जप सुरुच असायचा. प्रह्लाद म्हणायचा, भगवान विष्णू सर्वत्र आहेत. प्रह्लादचा नामजप ऐकून राजाला फार राग यायचा.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
3. शिक्षा आणि परीक्षा
हिरण्यकश्यपूला आपल्या मुलाची विष्णूभक्ती सहन झाली नाही. त्यांनी आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली. राजाने सेवकांना आज्ञा दिली की नामजपामध्ये मग्न असलेल्या प्रह्लादाला डोंगराच्या उंच कड्यावरून खाली खोल दरीत ढकलून द्या. सेवकांनी तसे केले पण काही वेळातच प्रह्लाद राजवाड्यातील येताना दिसला.
प्रह्लादाला जिवंत पाहून राजा चिडला आणि हा जिवंत कसा असे विचारले. तेव्हा प्रह्लादाने सांगितले की, खाली पडल्यावर मी एका झाडावर अलगद पडलो मग तिथून उतरलो आणि बैलगाडीत बसून आलो. हे ऐकून राजा निराश झाला. त्याने प्रह्लादाला अशा अनेक शिक्षा दिल्या जसे की
• विष देण्याचा प्रयत्न
• सापांच्या गुहेत टाकणं
• अग्नीत बसवणं पण प्रत्येक वेळी प्रह्लादाच्या श्रद्धेमुळे त्याचं रक्षण झालं.
4. अढळ विश्वास
प्रह्लाद कधीच घाबरला नाही. त्याचा विश्वास होता —जो खरच मनापासून देवावर श्रद्धा ठेवतो, त्याचं देव रक्षण करतोच. त्याच्या शांत चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त भक्ती होती.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
5. निर्णायक क्षण
एके दिवशी हिरण्यकश्यपूने रागाने विचारलं —तुझा विष्णू कुठे आहे? प्रह्लाद शांतपणे म्हणाला —तो सर्वत्र आहे. राजाने एका खांबावर प्रहार केला. त्या क्षणी खांबातून भगवान नरसिंह प्रकट झाले — ना पूर्ण माणूस, ना पूर्ण प्राणी.
6. न्यायाचा विजय
नरसिंहांनी संध्याकाळच्या वेळी (ना दिवस ना रात्र), दाराच्या उंबरठ्यावर (ना घरात ना बाहेर), आपल्या मांडीवर बसवून हिरण्यकश्यपूचा अंत केला. अशा प्रकारे वरदानाच्या अटी मोडल्या गेल्या आणि अन्यायाचा अंत झाला.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
7. भक्तीचा संदेश
प्रह्लादाची कथा शिकवते :
खरी श्रद्धा संकटातही ढळत नाही
अहंकाराचा शेवट नेहमी विनाशात होतो
देवावर विश्वास ठेवल्यास भीती नाहीशी होते
धैर्य आणि श्रद्धा एकत्र असतील तर चमत्कार घडतात.
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
बोध
ही कथा मुलांना शिकवते की कठीण परिस्थितीतही विश्वास आणि श्रद्धा सोडू नयेत.प्रह्लादासारखा अढळ विश्वास असेल तर संकटंही लहान वाटतात.
Prahlad Story : A Powerful Faith Bedtime Story for Kids | प्रह्लादाची भक्ती – अढळ श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणादायी कथा
FAQs
1. प्रह्लाद कोण होता?
प्रह्लाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा आणि भगवान विष्णूचा महान भक्त होता. लहान वयातही त्याची श्रद्धा अढळ होती.
2. हिरण्यकश्यपूने प्रह्लादाला शिक्षा का दिली?
हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानत होता. पण प्रह्लाद फक्त विष्णूची भक्ती करत असल्यामुळे त्याला राग आला आणि त्याने मुलाला अनेक शिक्षा दिल्या.
3. प्रह्लादाची भक्ती का प्रसिद्ध आहे?
प्रह्लादाने कितीही संकटं आली तरी देवावरचा विश्वास सोडला नाही. त्याची अढळ श्रद्धा आणि धैर्य यामुळे ही कथा आजही प्रेरणादायी आहे.
4. नरसिंह अवतार का प्रकट झाला?
हिरण्यकश्यपूच्या अन्यायाचा अंत करण्यासाठी भगवान विष्णू नरसिंह अवतारात प्रकट झाले. त्यांनी वरदानातील अटी मोडून न्याय प्रस्थापित केला.
5. प्रह्लादाच्या कथेतून मुलांना काय शिकायला मिळतं?
या कथेतून श्रद्धा, धैर्य, संयम आणि देवावर विश्वास ठेवण्याची महत्त्वाची शिकवण मिळते.