The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा भांडणाऱ्या दोन मांजरी ही एक बोधकथा आहे जी वाद, अहंकार आणि गैरसमज यांचे परिणाम सोप्या भाषेत समजावते. मुलांसाठी आणि पालकांसाठी उपयुक्त अशी ही कथा शांतता, संवाद आणि समजूतदारपणाचा संदेश देते. Kids moral story in Marathi about conflict resolution.
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
1. शांत गाव आणि दोन जिवलग मैत्रिणी
एका छोट्याशा गावात, एका जुन्या घराच्या अंगणात दोन मांजरी राहत होत्या. त्यांची चिंकी आणि मिंकी असे नावं होती. त्या खूप जिवलग मैत्रिणी होत्या. नेहमी दोघींच एकत्र खेळणं, एकत्र झोपणं आणि मालकाने दूध दिलं तर ते दिलेलं दूध एकमेकींना वाटून पिणं हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. जणू त्या एकमेकांच्या सावली होत्या. म्हणून गावकरी त्यांना “सावलीसारख्या” म्हणायचे, कारण एक दिसली की दुसरीही तिच्या जवळच असायची.
2. छोटासा मुद्दा, मोठं भांडण
एके दिवशी अंगणात एकच वाटी दूध ठेवलं गेलं. दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. दोघींना विचार आला की आता दूध कोण पिणार. तेवढ्यात चिंकी म्हणाली, “आज दूध मी आधी पिणार कारण काल तू आधी प्यायलीस. ”मिंकी चिडून म्हणाली, “नेहमी असच असतं तुझं! आज मी आधी पिणार.” लहानसा विषय होता, पण दोघींचा आवाज वाढला. दोघी एकमेकींवर गुरगुर करायला लागल्या, ओरडू लागल्या, शेपूट फुलवणं सुरू झालं. त्यांच्यातील मैत्रीचा धागा जणू तुटू लागला होता.
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
3. अहंकार जिंकला, समज हरली
दोघींनी ठरवलं –“मी माघार घेणार नाही. कोणीच माघार घेतली नाही. ते दूध तसंच राहिलं. भांडणातच त्यांचा वेळ गेला. आणि त्या भांडणात वाटीतलं दूध सांडलं गेलं. पण भांडण मात्र काही थांबलं नाही. त्या दिवसापासून दोघी वेगवेगळ्या जागी झोपायला लागल्या. एकमेकींकडे पाहणंही टाळू लागल्या.
अजून अशाच Moral Stories येथे वाचा
4. वादाचे दुष्परिणाम
त्या दोघींचे भांडण झाले पण त्या भांडणाचा परिणाम लगेच दिसू लागला.
• घरात उंदीर वाढले
• दोघींचं लक्ष कामाकडे राहिलं नाही
• मालकही नाराज झाला. सगळ्यात वाईट म्हणजे – दोघीही एकट्या आणि दुःखी झाल्या.
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
5. शहाणा सल्ला
एके संध्याकाळी, अंगणात बसलेला जुना कासव त्या दोघींजवळ आला आणि म्हणाला, “वादात कोण जिंकलं यापेक्षा, त्या वादात आपण आपलं महत्वाच काय गमावलं ते पाहा.” त्याचं ते बोलणं ऐकून चिंकी आणि मिंकी शांत झाल्या. थोडावेळ त्याच्या बोलण्यावर विचार केला आणि मग त्यांना जाणवलं की, खरच दूध नव्हे तर आमच्यातील मैत्री जास्त महत्त्वाची होती.
6. संवादातून तोडगा
चिंकी म्हणाली, “माझा अहंकार मोठा होता, चूक माझीही आहे.” मिंकीने मान हलवली,“मी ऐकलं असतं तर भांडण झालंच नसतं. त्यानंतर दोघींनी ठरवलं की पुढे काही घ्यायचं असेल तर वाटून घेऊ, भांडून नाही.
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
7. मैत्रीची पुनः सुरुवात
दुसऱ्या दिवशी मालकाने अंगणात दुधाच्या दोन वाट्या ठेवल्या होत्य . पण दोघींनी एकाच वाटीतून, पुन्हा वाटून दूध प्यायलं. कारण आता त्यांना कळलं होतं की, सामायिकरण भांडणापेक्षा मोठं असतं.
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
बोध
👉 वादाने प्रश्न सुटत नाहीत, संवादाने सुटतात
👉 अहंकारामुळे नातं तुटतं
👉 समजूतदारपणा शांतता आणतो
👉 मैत्री जिंकणं हेच खरं यश
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
The Quarrelling Cats Story in Marathi | भांडणाऱ्या दोन मांजरी – वादाचे परिणाम सांगणारी बोधकथा
FAQ
भांडणाऱ्या दोन मांजरी ही कथा कशाबद्दल आहे?
भांडणाऱ्या दोन मांजरी ही कथा वाद, अहंकार आणि गैरसमज यांचे दुष्परिणाम सांगते. ही कथा मुलांना संवाद, समजूतदारपणा आणि मैत्रीचे महत्त्व शिकवते.
ही कथा मुलांसाठी योग्य आहे का?
होय, ही कथा 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी अतिशय योग्य आहे. भाषा सोपी असून नैतिक संदेश स्पष्ट आहे.
या कथेतून मुलांना कोणता बोध मिळतो?
या कथेतून मुलांना हे शिकायला मिळते की भांडणाने प्रश्न सुटत नाहीत, तर शांत संवादाने आणि एकमेकांना समजून घेतल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतात.
पालक आणि शिक्षकांनी ही कथा का वाचून दाखवावी?
कारण ही कथा मुलांमध्ये सहनशीलता, मैत्री, समजूतदारपणा आणि वाद सोडवण्याची कला विकसित करते.