Value Education Importance | मुलांसाठी Value Education का गरजेचं आहे?

Value Education Importance | मुलांसाठी Value Education का गरजेचं आहे?Value Education म्हणजे काय आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते का आवश्यक आहे? चारित्र्य विकास, योग्य निर्णयक्षमता आणि सामाजिक मूल्ये घडवण्यासाठी पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षण

आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात मुलांना केवळ अभ्यासात हुशार बनवणं पुरेसं नाही. त्यांच्यात चांगली माणुसकी, योग्य वर्तन, जबाबदारी आणि नैतिक मूल्ये रुजवणं तितकंच महत्त्वाचं आहे. यालाच आपण Value Education (मूल्यशिक्षण) म्हणतो. हे शिक्षण म्हणजे फक्त नियम शिकवणं नाही, तर योग्य-अयोग्य यामधील फरक समजावणं आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणं.

📘 Value Education म्हणजे नेमकं काय?

✔ प्रामाणिकपणा

✔ आदर

✔ जबाबदारी

✔ सहानुभूती

✔ शिस्त

✔ संयमयासारखी जीवनमूल्ये शिकवणं. ही मूल्ये मुलांच्या वागणुकीत, विचारात आणि निर्णयांमध्ये दिसून यायला हवीत.

Value Education का गरजेचं आहे?

1. चारित्र्य विकासासाठी

या शिक्षणामळे मुलांमध्ये प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. अभ्यासात कितीही यश मिळालं तरी चांगलं चारित्र्य नसेल तर ते अपूर्ण ठरतं.

2. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते

जीवनात अनेक प्रसंग येतात जिथे योग्य आणि सोपा मार्ग वेगळा असतो. अशावेळी योग्य निर्णय घेण्यचीया गरज असते. या शिक्षणामुळे मुलांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. यामुळे मुलं दबावाखालीही योग्य निर्णय घेऊ शकतात.

3. Emotional intelligence विकसित होते

मुलं त्यांच्या भावना ओळखायला शिकतात, इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकतात आणि राग, दुःख, आनंद योग्य पद्धतीने व्यक्त करतात.

4. समाजात जबाबदार नागरिक घडतात

आज समाजात जबाबदार नागरिकांची गरज आहे. या शिक्षणामुळे मुलांना नियम पाळणं , सामाजिक जबाबदारी , इतरांप्रती आदर करणं हे यामुळे शिकायला मिळते. यामुळे समाज अधिक सुसंस्कृत आणि सुरक्षित बनतो.

5. नातेसंबंध मजबूत होतात

मुलं जेव्हा आदर, सहानुभूती आणि संवाद शिकतात तेव्हा त्यांचे नाते पालक, शिक्षक आणि मित्रांसोबत अधिक घट्ट होतात. कारण या सगळ्या गोष्ट महत्वाच्या आहेत जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हापासून त्यांच्या मनात रूजवलं की त्याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. आणि म्हणूनच हे शिक्षण महत्वाच आहे.

6. चुकीच्या सवयींपासून दूर राहतात

मूल्यशिक्षण असलेली मुलं वाईट सवयी, हिंसा, खोटेपणा आणि अनुचित वर्तनापासून दूर राहतात. त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते. आज मुलांमध्ये या गोष्टींचा अभाव दिसून येतो. त्यामुळे हे शिक्षण मुलांसाठी गरजेचे आहे.

Value Education Importance | मुलांसाठी Value Education का गरजेचं आहे?

🏫 हे शिक्षण शाळेत आणि घरी कसं द्यावं?

घरात

पालकांनी मुलांना रोज नवनवीन जीवनातील काही उदाहरणे द्यावेत. त्या उदाहरणातून त्यांना नवीन काहीतरी आहे, जेणेकरून मुलांमध्ये ते ऐकल्यानंतर स्फूर्ती येईल, त्यांना ऐकावसं वाटेल अशी उदाहरण द्या. मुलांना रोज लहान बोधपर गोष्टी, कथा सांगाव्यात आणि त्या कथेचा मुळ उद्देश काय ते त्यांना पटवून दयावे जेणेकरून त्यांनाही समजेल की काय चांगले आणि काय वाईट.

मुलांकडून कधी एखादी चूक झाली की लगेच त्यावर जास्त जोरात ओरडणयापेक्षा किंवा मारण्यपेक्षा त्यांना जवळ घेऊन शांतपणे समजावावं. त्यामुळेच कधी काही चूक त्यांच्याकडून झाली तर ते स्वतः तुमच्यकडे येऊन सांगतील.

मुलांनी काही चांगल काम केलं किंवा चांगले वाचलेत असं पालकांना वाटलं तर त्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करावं. त्यांना शाब्बासकी द्यावी त्यामुळे मुलांना अजून छान प्रेरणा मिळते. आणि ते तसं अजून छान वागायला बघता.

शाळेत

शाळेत मुलांना वेगवेगळ्या बोधपर कथा सांगाव्यात. मुलांना Group activities म्हणजे काय हे समजावून सांगाव आणि तसल्याच काही activities त्यांना करायला द्याव्यात. तसेच यासोबतच मुलांना Role play , Social service activities काय असतात हे समजावून सांगाव कारण ही शिकवण फक्त सांगितली नाही, तर अनुभवातून दिली तर ती कायम राहते.

watch More On

🧠 आजच्या digital युगात ह्या शिक्षणाचे महत्त्व

आज मुलं मोबाइल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन जगात जास्त वेळ घालवतात. त्यामुळेच त्यांना अभ्यास नकोनकोसा वाटतो. या शिक्षणामुळे त्यांना योग्य-अयोग्य कंटेंट ओळखता येतो , ऑनलाइन वर्तनात शिस्त येते , cyber bullying पासून स्वतःला वाचवता येतं

पालकांचे सामान्य प्रश्न (FAQ)

Q. हे शिक्षण कोणत्या वयात सुरू करावे ?

अगदी लहान वयापासून.

Q. फक्त शाळेवर अवलंबून राहावं का?

नाही. घर आणि शाळा दोघांची जबाबदारी आहे.

Q. Moral stories उपयोगी ठरतात का?

हो, त्या मुलांवर खोल परिणाम करतात.

अशाच छान माहितीसाठी वाचत राहा

निष्कर्ष

ह्या शिक्षणाने मुलांना फक्त यशस्वी नव्हे, तर चांगले माणूस बनवणं. आज दिलेली मूल्यांची शिकवण उद्याच्या समाजाचं भविष्य ठरवते. लक्षात ठेवा —गुणांपेक्षा मूल्ये मोठी असतात .

Leave a Comment