4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन आलेलो आहोत प्रेम कथा. प्रेम ही अशी भावना आहे जी आयुष्यात कधी,कुठे आणि कशी उगम पावेल हे कोणी सांगू शकत नाही.काहींसाठी ती पहिल्याच भेटीत फुलते तर काहींसाठी हळूहळू रुजते. आज आपण वाचणार आहोत अशीच एक हृदयस्पर्शी कथा – पहिल्या भेटीच प्रेम.
4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी
पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये अमित नावाचा मुलगा बी.ए पहिल्या वर्षाला प्रवेश घेतो. अमित फार हुशार,शांत,अभ्यासू आणि थोडा लाजाळूच होता.अमित कधी कुणासोबत लवकर मैत्री करत नसे.मुलींसोबत तर तो खूप कमी बोलायचा. कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे त्याला फारसं कोणी ओळखत नव्हतं.एके दिवशी इंग्रजीच्या लेक्चरला एक नवीन मुलगी वर्गात आली तिच नाव सिमा.
अमित तर थोडावेळ तिच्याकडे बघतच बसला,तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि डोळ्यातील चमक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होतं.कधी कुणाशी जास्त न बोलणारा अमित त्याने तिला पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वेगळीच भावना आली.
सिमा क्लासमध्ये आली,बसण्यासाठी इकडे तिकडे बघू लागली पण तिला बसण्यासाठी जागा शोधताना अडचण आली. कुठे बसाव तिला समजत नव्हत. तेव्हा अमितने हलक्या आवाजात सिमाला विचारलं, “इकडे बसशील का?” सिमा गालातल्या गालात हसली आणि त्याच्या शेजारी बसली ही त्यांची पहिली भेट होती.
4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी
ओळख वाढत जाते
अमित आणि सिमा दोघे चांगले मित्र झालेत.हळूहळू दोघे एकमेकांना भेटू लागले.रोज भेटू लागले.दोघे भेटले की खूप वेळ गप्पा मारत बसत,वेळ कसा निघून जात अमितला कळायचंच नाही.त्याला सिमा सोबत बोलतच बसावं असं वाटायच. मग काय त्यांच भेटणं वाढत गेलं.अमित काहीना काही कारण काढून सिमाला भेटायचा.कधी कॅन्टीन मध्ये एकत्र चहा प्यायला जात,तर कधी लायब्ररीत भेटत ,नोट्स एकमेकांना शेअर करत आणि अशाच छोट्या छोट्या गप्पांमधून त्यांची मैत्री घट्ट होत गेली.सिमा नेहमी उत्साही असायची.सतत अमितचा विचार करत असायची.तिला गप्पा मारायला,गाणं म्हणायला आणि चित्र काढायला खूप आवडायचं.
अमित मात्र शांत पण तिचं बोलणं ऐकायला त्याला नेहमी आवडत असत. एकदा कॅन्टीन मध्ये बसले असताना सिमा अमितला म्हणाली, अमित तुला माहिती आहे का “मला वाटतं की खरी मैत्री हेच खरं प्रेम असतं.”अमित फक्त हसला,त्याच्या मनात आधीच तिच्याबद्दल काहीतरी खास भावना निर्माण झाल्या होत्या. पण तो व्यक्त करू शकत नव्हता.त्याला बरेचदा वाटलं की सिमाला आपल्या मनातल सांगाव पण त्याची काही हिम्मत होत नसे.
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी
कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्राम घेणयाचं ठरल.त्यामध्ये सिमाने गाणं गायचं ठरवल.सिमाने गाणं गायलं. तिचा गोड आवाज सगळ्यांना भुरळ घालून गेला.अमित मात्र तिच्यकडे बघतच बसला.तिचं गाणं ऐकून तो थक्क झाला. त्याला जाणवलं की मी सिमावर प्रेम करतोय,पण प्रश्न होता की सिमाला कसं सांगायचं.
4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी
प्रेमाची कबुली
एक दिवस दोघं लायब्ररीत अभ्यास करत होती. बाहेर छान पावसाच वातावरण होतं. पावसाची रिमझिम पाहून सिमाला पावसात भिजावस वाटलं.सिमाला पावसात भिजायला खूप आवडायचं. तिने अमितला म्हटलं “चल, बाहेर पावसात जाऊया”. दोघं कॅम्पसच्या बागेत गेले आणि पावसाचा आनंद घेत होते.अमित सिमाकडे एकटक नजरेने बघत होता.पावसाच्या थेंबांमध्ये सिमा खूप सुंदर दिसत होती ते पाहून अमितच हृदय धडधडत होत. तिला पाहून अमित मनातच गुनगुनायला लागतो.
तुझ्या डोळ्यांत पाहिलं,
तर नभातला चंद्रही लाजला,
त्या ओठांवर उमटलेलं हसू
माझ्या हृदयात कायमचं साठलं।
पहिल्यांदा जेव्हा हात धरलास,
तेव्हा जगणं अर्थपूर्ण झालं,
प्रत्येक क्षणात जाणवलं मला,
प्रेमानं आयुष्य उजळून गेलं।
पावसाच्या थेंबात ओलं होतं मन,
तू सोबत होतीस म्हणून,
काळोख रात्रीत चांदण्यासारखं
तुझं प्रेम उजळून गेलं मनोमन।
तुझ्या स्पर्शातलं ऊबदारपण,
स्वप्नांना वास्तव देतं,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
“तू आहेस” हे जाणवतं।
शेवटी त्याने सिमासोबत बोलण्याचं धाडस केलं आणि सिमाचा हात आपल्या हातात घेतो अन् हलक्या आवाजात तिला म्हणातो, सिमा मला तुला काही सांगायचं आहे.खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे .आज तुला सांगाव असं वाटतय.” मला तुझ्याबद्दल खास भावना आहेत.” खरं सांगायचं तर माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.ते ऐकून क्षणभर सिमा शांत झाली. मग तिने अमितकडे बघितल आणि गालात हसत म्हणाली,”अमित,मलाही तुझ्याबद्दल असच वाटतं फक्त तू आधी बोलावं म्हणून मी थांबले होते.”दोघेही एकमेकांकडे बघून हसले. अमितने सिमाला घट्ट मिठी मारली .पावसाच्या थेंबांमध्ये त्यांच पहिलं प्रेम फुललं.
शिकवण
•खरं प्रेम हे हळूहळू वाढतं.
• विश्वास,मैत्री आणि परस्पर आदर हीच नात्याची खरी ताकद असते.
• पहिली भेट,पहिली मैत्री आणि पहिली कबुली हीच प्रेम कथेची सुरुवात असते.
4 Romantic Moments Of College Love Story First Meet|कॉलेज लव्ह स्टोरी
बोध
•प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही तर एकमेकांना समजून घेणं आहे.
•धैर्याने आपली भावना व्यक्त करणे गरजेचं आहे.
•नात्यात खरेपणा आणि आदर असेल तर ते आयुष्यभर टिकतं.