Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा ही कथा आहे न संपणाऱ्या इच्छांची, हव्यासाची आणि त्याच्या भयानक परिणामांची. इच्छेचं झाड ही धक्कादायक मराठी बोधकथा आपल्याला शिकवते की समाधानाशिवाय मिळालेलं यश माणसाला राक्षस बनवू शकतं. विचार करायला लावणारी आणि अंतर्मुख करणारी कथा.

Table of Contents

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

साधेपणातलं गरिबीचं जग

एका कोरड्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावात केशव नावाचा शेतकरी राहत होता. केशव गरीब, प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पण त्याचं आयुष्य सतत कोणत्या ना कोणत्या अडचणींनी भरलेलं होतं.

त्यांच्या गावात पाऊस कधी वेळेवर पडत नसे,शेतात आहे ती पिकं हातातून जात, आणि घरात आजार, कर्ज, उपासमार—सगळंच एकत्र. केशवची पत्नी सुलोचना मात्र वेगळीच होती. तिचा स्वभाव वेगळाच होता. तिला नेहमी आणखी हवं असायचं. जास्त पैसा, मोठं घर, लोकांत मान.

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

जंगलात सापडलेलं गूढ झाड

एक दिवस गावात अफवा पसरली की,“जंगलाच्या आत एक झाड आहे…असं झाड की त्याकडे जे मागाल ते देतं.”केशवने ते ऐकलं पण हसून सोडून दिलं होतं,पण त्याची पत्नी सुलोचनाचं मन मात्र तिथेच अडकलं होतं. जेव्हापासून तिने ते ऐकलं तिने केशव मागे एकच रट लावली होती. “एकदा जाऊन पाहा ना,” ती रोज म्हणू लागली.“काय जातंय आपलं?”

पहिली इच्छा – आशेचा प्रकाश

शेवटी तिचं म्हणणं ऐकून केशव एकदाचा त्या जंगलात गेलाच. जंगलात खूप आत गेल्यावर केशवला एक विचित्र झाड दिसलं. असं की त्या झाडाला ना फुलं, ना पानं होती. पण खोडावर डोळ्यासारखी गाठ दिसत होती. तेवढ्यात झाडातून आवाज आला.“सांग… तुला काय हवं?”

केशव दचकला, आणि हळूच आवाजात म्हणाला, माझ्या शेतीला पाणी नाही म्हणून पीक चांगली येत नाही. म्हणून माझी एक इच्छा आहे की,“माझ्या शेताला पाणी मिळू दे.”त्याने हे मागताच, क्षणात आकाश ढगांनी भरलं. पाऊस जोरदार कोसळू लागला. ते पाहून केशवला खूप आनंद झाला. घरी परतल्यावर सुलोचना खूश झाली…

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

समाधानाचं रूपांतर हव्यासात

पण हे समाधान फार काळ काही टिकलं नाही. “फक्त पाणी? सुलोचनाने परत एक मागणी केली. घर मोठं मागायचं होतं! ”दुसऱ्या दिवशी केशव पुन्हा जंगलात गेला. आणि दुसरी इच्छा व्यक्त केली की, मला मोठं घर दे. झाड हललं…आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं घर मोठं झालं.

हव्यासाने घेतलेली अंध वळणं

केशव जे मागेल ते झाड देत गेलं. पण सुलोचनाची इच्छा काही संपतच नव्हती त्या वाढतच गेल्या. पैसा, दागिने, जमीन, नोकर. केशव दरवेळी झाडाकडे जात राहिला. झाड प्रत्येक वेळी देत होतं…पण प्रत्येक वेळी केशव थोडा थकलेला,थोडा रिकामा वाटू लागला.

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

शेवटची इच्छा – सर्वात घातक

एक दिवस झाड म्हणालं—“आज तू तुझी शेवटची एक इच्छा माग.”घरी आल्यावर सुलोचना ओरडली—“लोक आपल्याला घाबरले पाहिजेत! आपण सर्वात शक्तिशाली असलं पाहिजे!”

Watch More On

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

झाडाची शांत इशारेवाणी

केशव पुन्हा जंगलात गेला. कंपलेल्या आवाजात केशव झाडाला म्हणाला की, “माझी पत्नी सर्वांत शक्तिशाली व्हावी.” झाड शांत झालं. आणि म्हणालं—“तुझी इच्छा पूर्ण.” इच्छा पूर्ण… पण आयुष्य उद्ध्वस्त

घरी परतल्यावर केशवने सुलोचनाकडे पाहिलं…ती लोकांकडे पाहत होती आणि लोकं तिला पाहून थरथरत होते. पण केशव तिच्या डोळ्यांत पाहताच थबकला. त्या डोळ्यांत माणुसकी नव्हती. भावना नव्हती. फक्त भूक होती. सुलोचना हसली…पण ते हसू नेहमीसारखं नव्हतं राक्षसी होतं. केशव मागे सरकला.

झाडाचं अदृश्य होणं

त्या रात्री गाव रिकामं झालं. आणि दुसऱ्या दिवशी जंगलात एक नवीन झाड उगवलं—ज्याच्या फांद्यांवर माणसांच्या न संपणाऱ्या इच्छांची सावली होती.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

Root of Greed | When Desires Were Fulfilled but Humanity Was Lost | A Shocking Moral Story | हव्यासाचं मूळ | इच्छा पूर्ण झाली… पण माणूस हरवला | धक्कादायक मराठी बोधकथा

बोध

• इच्छा गरजेपुरती असेल तर जीवन सुंदर असतं.

• हव्यास पूर्ण झाला की माणुसकी हरवते.

• प्रत्येक “हवं” हे “योग्य” नसतं.

• समाधान नसलेला माणूस शेवटी स्वतःलाच गमावतो.

Read More Bodhkatha

Leave a Comment