A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा ही एक गूढ, धक्कादायक आणि अंतर्मुख करणारी मराठी बोधकथा आहे. राजाचा आवाज ही कथा सत्ता, सत्य आणि भ्रम यामधील संघर्ष दाखवते. विचार करायला लावणारी आणि मनाला भिडणारी कथा, जी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
समृद्ध राज्य आणि गूढ राजा
एका समृद्ध राज्यात देवेंद्र नावाचा राजा राज्य करत होता. राजा न्यायप्रिय होता, पण राजाची एक गोष्ट सगळ्यांना विचित्र वाटायची. राजा कधीच स्वतः बोलत नसे. कधीच कुणासमोर येऊन बोलत नसे.
भिंतीतून येणारा राजाचा आवाज
दरबारात कोणताही हुकूम द्यायचा असेल, तर राजा समोर न येता त्याचा आवाज भिंतीतून येई .कोणी प्रश्न विचारला, तरी उत्तर पडद्याआडूनच मिळे. कोणी कधी समोर राजासोबत बोलले नाही. “राजा असाच असतो, ” मंत्री म्हणायचे. हळूहळू प्रजेलाही सवय झाली.
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
राजदरबारातील धक्कादायक घोषणा
एक दिवस राजदरबारात घोषणा झाली की, “जो कोणी या दरबारात राजाचा आवाज थेट ऐकेल, त्याला अमूल्य असं बक्षीस दिलं जाईल. ”सगळ्या नगरात खळबळ उडाली. अनेकांनी भरपूर प्रयत्न केला राजाचा आवाज ऐकण्याचा, पण कुणालाच राजाचा प्रत्यक्ष आवाज कधी ऐकू आला नाही.
अभय – शांत पण विचार करणारा तरुण
त्याच राज्यात अभय नावाचा एक तरुण राहत होता. तो हुशार, पण फार शांत होता. दरबारातील लोक अभयला कमी लेखायचे. महालातील गुप्त प्रवासअभयने मनाशी ठरवलं की, “राजाचा आवाजचं सत्य काय आहे हे शोधायचं. ”रात्री तो महालात शिरला. भिंतींमागून येणारा आवाज पाठलाग करत तो एका बंद दालनापर्यंत पोहोचला.
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
राजाच्या आवाजाचं भयावह सत्य
त्याने दार उघडलं. आत गेला तर आत कोणीच नव्हतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हत. पण त्याला तिथे एक विचित्रच बघायला मिळालं. त्याने पाहिलं की तिथे फक्त एक मोठा तांब्याचा नगारा, यंत्रणा, दोरखंड आणि आरसे होते. तेवढ्यात तिथे एक आवाज पुन्हा घुमला. “कोण आहेस तू?” अभयने थरथरत उत्तर दिलं, “मी प्रजेतील एक सामान्य माणूस आहे… पण तुम्ही कुठे आहात?” क्षणभर शांतता पसरली. मग मंद आवाज आला. “मी इथे नाही… कारण मी आता जिवंत नाही. ” हे ऐकून अभय हादरला.
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
सत्ता आणि सत्य यांच्यातील संघर्ष
आवाज पुढे म्हणाला, “खूप वर्षांपूर्वी माझा मृत्यू झाला होता. पण राज्य कोसळू नये म्हणून मंत्र्यांनी हा आवाज जिवंत ठेवला. ”राजा नसूनही राजा आहे?” अभय स्वतःशी पुटपुटला. “हो,” आवाज म्हणाला, “लोक सत्य ऐकायला तयार नसतात. त्यांना फक्त सत्ता जिवंत हवी असते.”
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
दरबारात सत्याचा उद्रेक
दुसऱ्या दिवशी अभय दरबारात गेला आणि त्याने जे काही पाहिलं आणि ऐकलं ते सगळं दरबारातील लोकांसमोर उघड केलं. अभयचं बोलणं ऐकून सगळा दरबार हादरला. प्रजा गप्प झाली. काय बोलावं कळेना. मंत्र्यांनी शिक्षा मागितली, पण लोकांनी अभयला पाठिंबा दिला.
शांततेतून जन्मलेलं नवीन नेतृत्व
त्या दिवशी पहिल्यांदाच राजवाड्यात इतकी शांतता होती. कोणताही आवाज नव्हता. त्यानंतर दरबारात नवीन राजाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा राजा जो समोर उभा राहून स्वतः दरबारातील लोकांशी बोलेल. आणि अशा राजाची निवड केली गेली. जो स्वतः बोलणारा होता. आजही त्या राज्यात म्हणतात—“आवाज मोठा असणं महत्त्वाचं नाही, सत्य जिवंत असणं महत्त्वाचं आहे.”
A Kingdom Ruled by a Lie | A Shocking & Thought-Provoking Moral Story | खोट्या आवाजाचं राज्य | सत्य आणि सत्तेची धक्कादायक मराठी बोधकथा
शिकवण
• सत्य लपवून सत्ता कधीच टिकत नाही.
• खोटा आवाज लोकांना फसवतो, पण कायम नाही.
• खरा नेता समोर उभा राहतो, लपून नाही बसत.