3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये एक नवीन गोष्ट घेऊन आलेला आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत की योग्य वेळी घेतलेला निर्णय कसे आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतो.

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण दररोज लहानमोठे निर्णय घेत असतो. काही निर्णय आपलं भविष्य बदलतात तर काही आपल्याला धडा शिकवून जातात. अशाच एका मनोरंजक गोष्टीतून आपण जाणून घेऊया की, विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय कसा आयुष्य वाचवू शकतो.

Table of Contents

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

एका हिरव्यागार, निसर्गरम्य जंगल होत आणि त्या जंगलाच्या कडेला एक सुंदर तलाव होता. त्या तलावात अनेक मासे राहत होते. पण त्यातील तीन मासे एकमेकांचे जिवलग मित्र होते. हे तिघेही रोज एकत्र पोहत, खेळत आणि तलावातील इतर मास्यांबरोबर आनंदाने राहत असत.

हे तीन मासे स्वभावाने एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते.

पहिला मासा – तो फार हुशार आणि दूरदृष्टी असलेला होता. तो नेहमी भविष्यकाळाचा विचार करायचा आणि वेळेवर योग्य पाऊल उचलायचा.

दुसरा मासा – तो बुद्धिमान तर होता, पण कधी कधी निर्णय घेण्यात उशीर करायचा. आधी समस्या समजून घेऊन मग त्यावर कृती करायची, असा त्याचा स्वभाव होता.

तिसरा मासा – तो निष्काळजी आणि बेफिकीर होता.त्याला कसलीच चिंता नसायची. जे होईल ते पाहू असा त्याचा विचार असे.

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

संकटाची चाहूल

एके दिवशी तलावाच्या काठावर काही मच्छीमार आले. त्यांनी तलाव पाहिला आणि एकमेकांना म्हणाले,

हा तलाव माशांनी भरलेला आहे. उद्या सकाळी जाळं टाकून आपण भरपूर मासे पकडूया.

हे पहिल्या माणसाने ऐकले आणि तो खूप चिंताग्रस्त झाला. त्याला लगेच धोका जाणवला. तो लगेच आपल्या दोन मित्रांकडे गेला आणि म्हणाला,

मित्रांनो, आपल्याला उद्या सकाळी इथे राहणं धोकादायक आहे. मच्छीमार आपल्याला पकडून घेतील. आपण आजच या तलावातून बाहेर पडून दुसऱ्या तलावात जाऊया.

हे ऐकून दुसरा मासा विचारात पडला. तो म्हणाला,

तू बरोबर बोलतोयस, पण आपण लगेच हा निर्णय नको घ्यायला आपण थांबून पाहूया. कदाचित मच्छीमार उद्या येणार नाहीत. आपण उद्या सकाळी परिस्थिती पाहू आणि खरच तसे असेल तर मग काही करूया.

तिसरा मासा मात्र हसला आणि म्हणाला,

अरे, तु लगेचच घाबरून जातो. तुला नेहमी भीतीचं वेड लागलेलं असतं. इतक्या दिवसांपासून आपण इथे सुखाने राहत आहोत. उद्या काही होईलच असं नाही. मी तर कुठेही जाणार नाही.

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

हुशार मास्याचा निर्णय

पहिल्या मास्याने जास्त वेळ घालवला नाही आणि विचार केला की या तलावातून दुसरीकडे गेलेलं बर. त्याने ताबडतोब तलावातील एक छोटा पाणी जाणारा मार्ग शोधला आणि रात्रीच दुसऱ्या तलावात निघून गेला. तो सुरक्षित ठिकाणी पोहोचला आणि समाधानाने झोपी गेला.

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

दुसऱ्या दिवसाची सकाळ

सकाळी मच्छीमार आले आणि त्यांनी तलावात जाळं टाकायला सुरुवात केली. हे पाहताच दुसऱ्या मास्याने पटकन आपल्या बुद्धीचा वापर केला. तो जाळ्यात अडकला असं दाखवत वर तरंगला. मच्छीमारांना वाटलं की मासा मेलाय, त्यांनी त्याला पाण्याबाहेर फेकून दिलं. लगेचच तो पुन्हा पाण्यात उडी मारून पळून गेला आणि दुसऱ्या तलावात गेला.

अशाच गोष्टींसाठी येथे क्लिक करा

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

तिसऱ्या मास्याचं दुर्दैव

पण तिसरा मासा निष्काळजी होता.जे होईल ते होईल या विचाराचा. त्याने काही तयारी केली नव्हती. तो जाळ्यात अडकला आणि मच्छीमारांनी त्याला पकडलं. दुर्दैवाने त्याचं प्राण वाचवणं शक्य झालं नाही.

शिकवण

ही गोष्ट आपल्याला आयुष्यातील निर्णय घेण्याचं महत्व शिकवते. योग्य वेळी घेतलेला निर्णय आपल्याला संकटातून वाचवू शकतो, तर उशीर किंवा निष्काळजीपणा आपल्यासाठी घातक ठरू शकतो.

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

5 मुख्य धडे:

वेळीच कृती करा : समस्या ओळखताच उपाययोजना करायला हवी.

दूरदृष्टी महत्वाची आहे : भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे.

धैर्य आणि बुद्धी दोन्ही वापरा : संकटात घाबरून न जाता शहाणपणाने वागा.

टाळाटाळ टाळा : वेळ न दवडता कृती करणं हेच यशाचं रहस्य आहे.

बेफिकिरी टाळा : “जे होईल ते पाहू” असा विचार आपल्याला अडचणीत टाकू शकतो.

Watch More On 

3 Fishes Story – A Beautiful Lesson on Thoughtful Decision Making | 3 मासे कथा – विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सुंदर धडा

निष्कर्ष

“तीन मासे” ही फक्त मास्यांची गोष्ट नाही, तर आपल्या जीवनाची आरशी आहे. जीवनात संकटं येतातच, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे विचारपूर्वक निर्णय घेण्याची कला असणं गरजेचं आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आपल्याला सुरक्षित ठेवतो, तर निष्काळजीपणा आपल्याला धोका निर्माण करू शकतो.

म्हणूनच, पुढच्यावेळी तुम्ही एखाद्या निर्णयासमोर उभे असाल, तेव्हा या तीन मास्यांची आठवण ठेवा आणि पहिल्या मास्यासारखा शहाणपणा दाखवा.

Leave a Comment