2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री आईला मदत करणारी सावी” आणि “खरी मैत्री” या दोन सुंदर झोपेच्या नैतिक गोष्टी मुलांना जबाबदारी आणि मैत्रीचं महत्व शिकवतात.

Table of Contents

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

Aaila Madat Karnaari Savi – A Marathi Bedtime Story About Helping Parents and Good Habits | आईला मदत करणारी सावी – मुलांसाठी घरकामाची सवय लावणारी सुंदर झोपेची गोष्ट

मुलांना घरकामाची सवय आणि जबाबदारी शिकवणारी ही सुंदर झोपेची गोष्ट. “आईला मदत करणारी सावी” मुलांमध्ये सहकार्य, प्रेम आणि कृतज्ञता वाढवते.

1. प्रस्तावना

एका छोट्या गावात सावी नावाची गोड मुलगी राहत होती. ती खूप हुशार होती, पण तिला एक सवय होती की, शाळेतून घरी आली किंवा बाहेरून खेळून आल्यावर ति तिच्या वस्तू कधीच जागेवर ठेवायची नाही. सगळीकडे तिच्य खेळण्यांचा नाहीतर पुस्तकांचा पसारा असायचा.

2. आईची धावपळ

सकाळी आई उठली की तिच्यामागे धावपळ असायची. स्वयंपाक करणं, कपडे धुणं, घर साफ करणं अशी सगळी कामं तिला एकटीलाच करावी लागत असे. सावी शाळेत जायची, खेळायची, पण आई किती थकते हे तिच्या लक्षात येत नव्हतं.

3. छोटा प्रसंग

एक दिवस सावीने पाहिलं. आईला खूप ताप आला होता. तरीही आई स्वयंपाकघरात काम करत होती. सावी आईला म्हणाली, आई, तुला बरं नाही ना.. तू बस ना. मला सांग मी काय करू? आईने हसत सांगितलं, तू फक्त तुझी खेळणी आवरून ठेव.

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

4. बदलाची सुरुवात

त्या दिवशी सावीने तिची खेळणी, पुस्तके, बूट सगळं नीट लावून ठेवलं. ते पाहून आईच्या चेहऱ्यावर हसू आलं. सावीला जाणवलं की, मी मदत केली तर आई आनंदी होते.

5. रोजची सवय

हळूहळू सावी रोज छोटी छोटी कामं करू लागली..

आपलं जेवणाचं ताट स्वतः उचलून स्वयंपाकघरात ठेवणं.

पाणी भरून ठेवणं

शाळेची बॅग स्वतः आवरणं. आईचा ताण कमी झाला.

6. कौतुकाचा क्षण

एके दिवशी बाबांनी हे सगळं पाहिलं आणि म्हणाले, आपली सावी मोठी झाली आहे. सावी अभिमानाने हसली.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

7. शिकलेला धडा

सावीला समजलं — घरकाम म्हणजे शिक्षा नाही, तर कुटुंबाची जबाबदारी आहे. आईला मदत करणं म्हणजे प्रेम दाखवणं आहे.

या गोष्टीतून काय शिकायला मिळालं?

घरकामाची सवय मुलांना जबाबदार आणि संवेदनशील बनवते.

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

Khari Maitri – A Marathi Bedtime Story About True Friendship for Kids | खरी मैत्री – चांगल्या मित्राची ओळख सांगणारी मुलांसाठी सुंदर गोष्ट

मुलांना खरी मैत्री म्हणजे काय हे समजावणारी सुंदर नैतिक गोष्ट. “खरी मैत्री” मुलांना विश्वास, साथ आणि प्रेमाचं महत्व शिकवते.

1. प्रस्तावना

रोहन आणि विवान हे दोन मित्र एका शाळेत शिकत होते. ते रोज एकत्र खेळत, अभ्यास करत. एकमेकांना मदत करत.

2. छोटं भांडण

एक दिवस खेळताना त्या दोघांचं भांडण झालं. रोहन रागावून म्हणाला, मी तुझ्याशी बोलणार नाही.

3. अडचणीची वेळ

दुसऱ्या दिवशी खेळत असताना रोहन शाळेत पडला आणि त्याचा पाय दुखावला. सगळे मुले हसत होती. पण विवान धावत आला. त्याने रोहनला उचललं आणि शिक्षकांकडे नेलं.

Watch More On

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

4. जाणीव

रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो विवानला म्हणाला, मी काल तुझ्यावर रागावलो होतो, पण तू मला मदत केलीस. विवान हसून म्हणाला, खरा मित्र राग धरत नाही.

5. खरी मैत्री

त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं —भांडण झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही.

2 Marathi Moral Stories for Kids – Helping Parents and True Friendship | मुलांसाठी 2 सुंदर नैतिक गोष्टी – घरकामाची सवय आणि खरी मैत्री

6. शेवट

त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. सगळे म्हणू लागले — ही आहे खरी मैत्री!

या गोष्टीतून काय शिकायला मिळालं?

खरा मित्र आनंदात आणि अडचणीत दोन्ही वेळेस साथ देतो.

Leave a Comment