2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children ही दोन मजेशीर, हलक्याफुलक्या आणि खळखळून हसवणाऱ्या मराठी बालकथा मुलांसाठी खास तयार केलेल्या आहेत. “टोपी घातलेला कुत्रा आणि गावाचा गोंधळ” या कथेत एका निरागस कुत्र्यामुळे संपूर्ण गावात निर्माण झालेला गमतीशीर गोंधळ पाहायला मिळतो, तर “शाळेत हरवलेली घंटा आणि मुलांची मौज” या कथेत शाळेतील एक छोटी घटना मुलांच्या धमाल कल्पनाशक्तीमुळे मोठ्या हास्यनाट्यात बदलते.

या funny Marathi kids stories मधून मुलांना निरीक्षणशक्ती, टीमवर्क, आनंदाने समस्या सोडवणं आणि हसत-खेळत शिस्त पाळणं शिकायला मिळतं. ब्लॉग वाचन, शाळेतील उपक्रम, गोष्टींचे तास आणि कुटुंबासोबत वाचण्यासाठी या कथा अगदी परफेक्ट आहेत.

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

टोपी घातलेला कुत्रा आणि गावाचा गोंधळ

गावातला शांत कुत्रा

रामपूर नावाचं एक छोटसं गाव होतं. गाव फारसं मोठं नव्हतं, पण तिथले लोक फारच उत्साही होते. या गावात एक भटका कुत्रा होता. त्याचं नाव होतं बंटी. बंटी शांत, गोड आणि सगळ्यांचा लाडका होता.

अचानक डोक्यावर टोपी

एके दिवशी गावात जत्रा भरली होती. मुले जत्रेत खेळत होती. जत्रेत सगळी मुले रंगीबेरंगी टोप्या घालून फिरत होती. खेळता-खेळता चिंटूची टोपी उडाली आणि उडून थेट बंटीच्या डोक्यावर पडली! बंटी त्या टोपीकडे पाहत बसला. बंटीला वाटलं, “अरे! हे काहीतरी वेगळंच आहे!” तो उड्या मारू लागला. ती टोपी घालून इकडे तिकडे पळायला लागला. ती टोपी तशीच घालून बंटी गावात फिरायला निघून गेला. आता खरी धमाल सुरू झाली.

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

🤣गावकऱ्यांचा गैरसमज

पहिल्यांदा काकूंनी कुत्र्याला पाहिलं आणि म्हणाल्या “अगं बाई! हा कुत्रा टोपी घालून चाललाय!” मग आजोबांनी पाहिलं आणि म्हणाले, “हे काहीतरी शुभ चिन्ह वाटतं!” आणि गावातील काही लोकं तर त्याला पाहून घाबरलेच. लोकं एकमेकांत बोलायला लागली की “हा कुत्रा नाही… हा बहुतेक माणूस आहे जादूने बदललेला!”

गोंधळाची साखळी

गावात सगळीकडे एकच गोंधळ उडाला. त्या कुत्र्याला पाहून कोणी दरवाजे बंद करत होते, कोणी झाडावर चढले, तर कोणी मोबाईल काढून त्याचे फोटो काढू लागले. गावात फक्त त्याचीच चर्चा.

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

सत्य उघड होतं

हे सगळं चालू असताना तेवढ्यात मुलांचा टोळका आला. त्यातील चिंटूने पाहिलं की कुत्र्याच्या डोक्यावर तर माझी टोपी आहे. आणि तो हसत म्हणाला, “अरे! ही तर माझी टोपी आहे!” त्याने टोपी काढली…आणि बंटीने शेपटी हलवली. सगळे जोरजोरात हसायला लागले. गावातला गोंधळ हशात बदलला. आजोबा म्हणाले, “भीतीपेक्षा हसणं भारी!”

शिकवण

👉 प्रत्येक वेळी घाबरण्याआधी विचार करावा.

👉 हसण्याने सगळे गैरसमज दूर होतात.

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

शाळेत हरवलेली घंटा आणि मुलांची मौज

नेहमीसारखी शाळेची सकाळ

शाळेची सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली. शाळेची घंटी वाजली—टिंग टिंग! घंटेचा आवाज ऐकून सगळे मुलं वर्गात पळायला लागले. नेहमीसारखाच पहिला तास सुरू झाला. पहिला तास संपतच आला आणि घंटी वाजली. मग दुसरा तास सुरू झाला.

अचानक घंटा गायब

पण दुसऱ्या तासाची वेळ झाली…घंटी वाजलीच नाही. मुलं एकमेकांकडे पाहू लागली. विचारू लागली की तास संपत का नाही? सगळे एकमेकांना एकच प्रश्न विचारत “तास संपला का?” “मॅडम विसरल्या का?” पाच मिनिटे… दहा मिनिटे…घंटी अजूनही शांत.

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

2 Funny Marathi Kids Stories | टोपी घातलेला कुत्रा & शाळेत हरवलेली घंटा | Comedy Stories for Children

मुलांची मौज सुरू

शेवटी मुलांची मौज सुरू झाली 😄 कोणी वहीत चित्र काढतंय, कोणी गाणी गुणगुणतंय, तर कोणी म्हणतं, “आज सुट्टीच आहे असं वाटतं!” शिक्षकही गोंधळले. “घंटी कुठे गेली?”

शोधमोहीम

सगळ्यांनी शोधमोहीम सुरू केली. ऑफिस, मैदान, स्टाफरूम—सगळीकडे शोध. शेवटी शाळेचा शिपाई हसत आला. त्याच्या हातात डबा होता. तो म्हणाला,“साहेब, घंटा सापडली!” घंटा कुठे होती माहीत आहे? शिपायाच्या डब्यात! तो म्हणाला, “काल साफसफाई करताना चुकून डब्यात पडली!” सगळे जोरात हसले. घंटी पुन्हा वाजली—टिंग टिंग!

Watch More On

शिकवण

👉 शिस्त महत्त्वाची आहे.

👉 पण थोडी मौज आयुष्य सुंदर करते.

Leave a Comment