1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला ही प्रेरणादायी मराठी कथा “देवाची खरी भक्ती” आपल्याला शिकवते की देवाला सोनं-दागिने नव्हे, तर शुद्ध मन आणि निस्वार्थ भावनेची गरज असते. एका गरीब म्हातारीच्या एका लुटी दुधाने संपूर्ण राजाचा कुंभ भरला आणि सर्वांना भक्तीचा खरा अर्थ समजला. वाचा ही Heart-Touching Marathi Story आणि जाणून घ्या — दया, करुणा आणि प्रेम यांची खरी शक्ती.

Table of Contents

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

राजा – शिवभक्त आणि शिवरात्रीचा संकल्प

राजा मोठा शिवभक्त होता. एकदा त्यानं शिवरात्रीच्या निमित्ताने पाट नगरच्या सर्व ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन घालायचं नक्की केलं. भोजनासाठी जे पदार्थ आधी तयार करायचे होते त्याचा भगवान शिव यांच्या समोर नैवेद्य दाखवायचा होता.

त्यानंतर ब्राह्मण भोजनाला सुरुवात होईल असे निश्चित केले होते. आचारीने राजांना विनंती केली की, जवळजवळ सगळाच स्वयंपाक दुधात तयार करावा लागणार आहे, त्यासाठी बरेच दूध लागणार आहे.

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

दुधासाठी राजाचा आदेश

महाराज म्हणाले ती काय मोठी गोष्ट आहे? राज्याच्या मोठ्यात मोठ्या चौकाच्या मधोमध मोठा कुंभ ठेवा आणि दवंडी पिटवा की शिवरात्रीच्या दिवशी कोणीही दुधाचा उपयोग करायचा नाही. घराघरातून सर्वांनी जेवढं असेल तेवढं सगळं दूध आणावे आणि महाकुंभात ओतून जावे. महाराज म्हणाले घराघरातून दूध आल्यास हा महाकुंभ पण उतू जाईल आणि तुम्हाला पाहिजे तेवढे दूध मिळेल.

शिवरात्रीचा दिवस आला. पहाटेपासूनच माणसं महाकुंभात दूध ओतून जात होती. बघता बघता राज्यातले जवळपास सर्व लोक दुध ओतून गेले होते. तरीपण नवलाईची गोष्ट म्हणजे कुंभ तर तसाच्या तसा रिकामा होता.

थोडंफार दूध दिसत होतं पण ते सगळ्या ब्राह्मणांना पुरेसं नव्हतं. राजाने घरोघरी शिपाई पाठवून तपास करायला सांगितले , बघा एकदा घर बाकी तर राहिल नाही ना ? जेवढे बाकी होते ते घाई घाईने येऊन दूध ओतून गेले होते पण महा कुंभ भरला नाही तो भरलाच नाही.

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

एका म्हातारीचा उशीर आणि शंका

शेवटी शिपायाने बातमी आणली महाराज पाटनगरातील कुठलंच घर बाकी राहिलं नाही पण एक म्हातारी अशी आहे की ती अजून पर्यंत दूध घेऊन आली नाही. महाराज म्हणाले, ही म्हातारी स्वतःला काय समजते? जा तिला बोलावून आणा. तिला सांगा की दूध घेऊनच ये नाहीतर राजदंड भोगावा लागेल.

राज सेवक जेव्हा म्हातारीला पकडण्यासाठी गेले तेव्हा म्हातारी घरातून निघतच होती. ती म्हणाली, बाबांनो! मी येतच होते. उगीचच अशी पळापळी करायची काय आवश्यकता होती? मी आहे जख्ख म्हातारी.

मला बरीच कामं एकटीला उरकायचे असतात म्हणून जरा उशीर झाला. बरं चला, बघा हे आहे माझ्या हिश्याच दूध. म्हातारी जवळ एक लोटीभर दूध होतं. कोण जाणे एवढ्याश्या दुधाने राजाचा कुंभ किती भरणार होता, त्यासाठी त्यांनं आपली पूर्ण सैनिकाची फौज पाठवली होती.

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

आश्चर्यकारक प्रसंग

कुंभ भरून उतू गेला. म्हातारीने येऊन राजाला नमन वंदन केले आणि स्वतःच्या हिस्साच दूध जय भोळा शंभू म्हणत महाकुंभात ओतले. आश्चर्य! नवलईची गोष्ट. अगदी बघण्यासारखी होती. महाकुंभातलं दूध एकाएकी उतू जाऊ लागलं आणि शिवाच्या जटेतून जशी गंगा वाहते तसं महाकुंभातून दूध हिंदकळत बाहेर येऊ लागलं.

सर्वांनाच अचंबा वाटला. सगळे डोळे फोडून या कुंभाकडे बघत होते. खुद्द राजाला हे दृश्य बघून राहवलं नाही. त्यानं म्हातारीला विचारले, म्हातारे तू काय जादू बिदू जाणतेस की काय? तुझ्या एक लोटी दुधानं हा कुंभ कसा काय भरून उतू जाऊ लागला?

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

म्हातारीचं उत्तर – खरी भक्ती म्हणजे दया

अरे महाराज ती म्हातारी म्हणाली, जादू कसली अन घडलेली हकीकत कसली? मी एक गरम गरीब म्हातारी आहे. मेहनत मजुरी करून देवाच्या साक्षीने जीवन जगत आहे. तुमच्या हुकमाचं वेळेवर पालन न करू शकल्यामुळे मी तर घाबरलेच होते. पण काय करू? रोजच्यासारखं सकाळी लवकर उठून दुधाची धार काढली. गाईनं मला रोजच्यासारखं उत्साहाने दूध दिलं.

अर्ध दूध मी तिच्या वासराला पाजलं. हो नाही तर काय, पहिला हक्क त्याचाच खरं ना? त्यातून जे अर्ध उरलं त्यातलं मी माझ्या मुलाला पाजलं, मुलाला काय दुधाशिवाय रडत ठेवायचं असतं होय? शिवाय त्यातून अर्ध दूध थोडं माझ्या कुत्र्याला आणि मांजरीला पाजलं.

दोघं माझ्या घराचे रक्षक आहे. आणि त्यांचा मला खूप आधार आहे. शेवटी बाकी जे काही उरलं ते मी आपल्या महाकुंभात ओतलं आहे. आता तुम्हाला जे समजायचं ते समजा. जादू मानत असेल तर जादू आणि कर्तव्य मानत असेल तर कर्तव्य.

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

राजा हे ऐकून थक्क झाला ब्राह्मणांनी रागाने कान केव्हापासून टवकारले होते. राजाने लगेच विचारलं, म्हातारे तू हे काय केलंस? तू देवासमोर उरलेले दूध ओतलस? देवाचा हक्क तर आपल्या सगळ्यांच्या दुधावर आहे.

आपण चुकता आहात महाराज, म्हातारी म्हणाली, देवाचं पोट भरायचं असेल तर त्यांना निर्माण केलेल्या जीवाचं पोट भरायला हवं. आज आपण सगळ्या घराघरातून दूध आणून घेतलं. आता विचार करायला हवा की दुधाशिवाय राज्यात आज किती बालकं भूकेली असतील?

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

काय तुम्ही असं मानता की ही सर्व बालकं भुकेली ठेवून भगवान शिवशंकर कुंभ भरून दूध पिऊन टाकतील? म्हातारी स्पष्ट म्हणाली, तुम्ही सर्वांनी बालकांचं दूध हिसकावून कुंभ भरण्याची कोशिश केली. म्हणूनच कुंभ भरत नव्हता, अर्धवट रिकामा राहत होता. जेव्हा मी वासराला बालकाला, कुत्रा आणि मांजराला दूध पाजून बाकीचे उरलेलं दूध देवाला वाहिलं तेव्हा देवानं त्याचा स्वीकार केला आणि कुंभ भरभरून उतू जाऊ लागला.

अजून येथे वाचा

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

राजाची जाणीव आणि परिवर्तन

म्हातारीचं म्हणणं ऐकून राजाचे डोळे उघडले. त्याला वाटलं हिसकावलेलं दूध देवाला पाजल्यानं देव त्याचा स्वीकार करणार नाही. तसं सगळं दूध ब्राह्मणांना पाजल्यानंही देव राजी होत नाही. त्या दुधावर ज्याचा पहिला हक्क आहे अशा बालकांपर्यंत पोहोचवल्यास देव तृप्त होतो.

राजा ते सगळं दूध छोट्या छोट्या बालकांसाठी पोहोचत केलं. राजानं ह्याआधी म्हातारी आजीचा विशेष सन्मान केला. आणि म्हातारीला राजमाता म्हणून घोषित केले. राजमातेचे विचार ऐकून राज्यातील एखादा जरी माणूस उपाशी असेल तर राजानं स्वतः भोजन न घेण्याची प्रतिज्ञा केली.

Watch More On

1 Heart Touching Story Of True Devotion | देवाची खरी भक्ती एका गरीब म्हातारीच्या दुधाने राजाचा कुंभ भरला.

शिकवण

खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर इतरांच्या पोटाची काळजी घेणं.

दया आणि करुणा या देवापेक्षाही मोठ्या शक्ती आहेत.

भक्तीचं मूल्य समजलं, तरच जीवनाला अर्थ मिळतो

Leave a Comment