1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत. सासू-सुनेचा वाद ही एक मजेदार कौटुंबिक हास्यकथा आहे जी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.

या कथेत राधा आणि तिच्या सासूबाईंचा छोटासा मीठावरून झालेला वाद घरात हास्याचा फवारा उडवतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून निर्माण होणारे वाद आणि त्यातील मजा यामुळे ही कथा प्रत्येक घरातल्या वाचकांना रिलेट होईल. कौटुंबिक नाती, हशा आणि प्रेम यांचा मिलाफ असलेली ही कथा तुमच्या ब्लॉगसाठी परफेक्ट आहे आणि वाचकांना पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल.

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

एक विटा नावाचं छोटसं गाव होतं. त्या गावात रामु काकांचं छोटसं कुटुंब राहत होतं. त्यांच्या कुटुंबात रामु काका, त्यांची बायको म्हणजेच सासूबाई, त्यांचा मुलगा गण्या आणि सून राधा  एवढी मंडळी राहत होती. त्यांच्या घरात वातावरण नेहमी शांत असायचं, पण कधी-कधी सासू-सुनेत भांडण झाली की घरात धमाल घडवून आणायचे. एकदा असाच  प्रकार घडला.

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

घरातील सकाळचा माहोल

सकाळची वेळ होती. सगळी आपआपली कामे करत होती. राधा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती आणि सासूबाई देवघर साफ करत होत्या. देवघर साफ करता करता त्यांची नजर स्वयंपाक करत असलेल्या राधाकडे जाते आणि त्यांनी पाहिलं की राधा भाजीला जरा जास्त मीठ टाकत होती. मग त्या तिथूनच जोरात ओरडल्या.

अगं राधे, इतकं मीठ घालतेस का भाजीला ? तुला काही कळतं का ? डॉक्टरांनी सांगितलंय कमी मीठ खायला! आणि तू इतकं मीठ घालतेस. सासूबाईंनी ओरडतच सांगितलं.

राधा म्हणाली, आई, मीठ जास्त नाही घातलय हो! भाजीला चव यावी म्हणून टाकलं.

चव यावी म्हणून का? अरे गण्या , तुझी बायको तर आमचं रक्तदाब वाढवणार! सासूबाई उद्गारल्या.

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

गण्याची एन्ट्री

तेवढ्यात गण्या हॉलमधून म्हणाला, आई, तुम्ही दोघी भांडू नका, मीठ मी कमी-जास्त करीन.

राधाने भाजीमध्ये खरंच कमी मीठ टाकलं होत. पण गोष्ट तिथेच थांबली नाही. दुपारच्या जेवणाला सगळे जमले. जेवायला सुरुवात झाली. जेवताना सासूबाईंनी पहिला घास घेतला आणि म्हणाल्या,

अगं राधे, ही भाजी इतकी बेचव कशी? जरा मीठ घालायचं होतं!

राधाने हसू आवरत म्हणाली, आई, तुम्हीच म्हणालात ना मीठ कमी ठेवायला!

अगं, कमी ठेवायला म्हटलं, पण इतकंही कमी नाही की भाजी गोड लागावी!

गण्या हसू आवरू शकला नाही. तो म्हणाला, आई, तुम्हाला जास्त मीठ चालत नाही, राधेला जास्त मीठ घालायचं नाही, आणि मला मात्र या दोन्हींचा गोंधळ सोडवायचा आहे.

अजुन येथे वाचा

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

राधाचा भन्नाट सोल्युशन 

पुढच्या दिवशी राधाने एक भन्नाट उपाय शोधला. तिने जेवण बनवताना भाजी अगदी साधी केली आणि जेवणाच्या वेळी टेबलावर एक छोटी मीठाची डबी ठेवली.

सासूबाई हसत म्हणाल्या, हा झाला बरा उपाय! आता आम्ही हवं तेवढ मीठ घालू.

त्याच दिवशी रात्री सगळे मिळून बसले होते. सासूबाई मोबाईलवर व्हिडिओ बघत होत्या आणि अचानक जोरात हसू लागल्या. राधा विचारते, आई, काय झाल का इतकं हसताय?

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

Watch More On 

कुटुंबातील हास्याचा फवारा

अगं, हा बघ, एका व्हिडिओत सासू-सुनेत भांडण चाललंय. अगदी आपल्या घरासारखं! सासूबाई म्हणाल्या आणि सगळे खळखळून हसू लागले.

गण्या म्हणाला, आई, राधा, तुमच्या भांडणामुळे घरातली मजा दुप्पट होते.

तेव्हापासून सासू-सुनेत भांडण झालं की घरातल्या सगळ्यांना हसण्याचा नवा विषय मिळायचा. वादाचा शेवट नेहमी हसण्यातच व्हायचा आणि घरातला माहोल आणखी रंगतदार व्हायचा.

1 Funny Family Story That Will Make You Laugh Out Loud | 1 सुपर मजेदार कौटुंबिक हास्यकथा – सासू सुनेचा धमाल वाद

शिकवण

लहानसहान गोष्टींवरून मोठे वाद करू नयेत – छोट्या गोष्टींवरून घरात तणाव निर्माण होतो, त्याऐवजी हसतखेळत तो सोडवावा.

संवादाने समस्या सुटतात – राधाने योग्य उपाय शोधून घरातील वाद कमी केला आणि सगळ्यांसाठी सोपा मार्ग काढला.

लवचिकता आणि समजूतदारपणा गरजेचा आहे – आपल्याला सगळ्यांना सोयीस्कर असा उपाय शोधायला हवा.

हसण्यातून नातं मजबूत होतं – वादाचा शेवट हसण्यात झाला, त्यामुळे घरातील वातावरण हलकं-फुलकं झालं.

प्रत्येक घरात लहानसहान मतभेद असतात – त्यांना मनावर न घेता त्यातून मजा काढली तर घरातला माहोल सकारात्मक राहतो.

प्रॉब्लेमपेक्षा सोल्यूशनवर लक्ष द्या – राधाने भांडणात अडकण्याऐवजी त्यावरचा उपाय शोधला.

Leave a Comment