1 Best Marathi Moral Story for Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा ही मराठी बालकथा मुलांना खरी मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचं महत्त्व शिकवते. “मित्राचा खरा अर्थ” ही कथा लहान मुलांसाठी प्रेरणादायी आहे. वाचा आणि शेअर करा ही सुंदर नैतिक गोष्ट.
1 Best Marathi Moral Story For Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा
गावातील दोन जिवलग मित्र
एक विटा नावाच छोटसं गाव होत. त्या गावात दोन जिवलग मित्र राहत होते. एकाचे नाव आरव आणि दुसरा होता सोहम. दोघेही एकाच शाळेत आणि चौथीच्या वर्गात शिकत होते. एकाच वर्गात होते, सोबतच बसायचे.
आरवचा स्वभाव शांत, तो खूप अभ्यासू आणि नेहमी इतरांना मदत करणारा , तर सोहम थोडा खट्याळ पण मनाने खूप चांगला होता. दररोज शाळेत जाताना दोघे एकत्र जायचे, एकत्र खेळायचे, मधल्या सुट्टीत डबा शेअर करायचे आणि एकमेकांच्या गृहपाठात मदत करायचे.
1 Best Marathi Moral Story For Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा
शाळेत स्पर्धेची घोषणा
एक दिवस शाळेने स्पर्धा घेण्याचे ठरवले. स्पर्धा जाहीर झाली, विज्ञान प्रदर्शन (Science Exhibition) घेण्याचे शाळेने ठरवले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा एक छोटा प्रकल्प बनवायचा होता. सगळे विद्यार्थी कोणता प्रकल्प करायचा विचार करू लागले. इकडे आरवने ठरवलं की तो सौरऊर्जेवर चालणारी गाडी बनवेल, तर सोहमने ठरवलं की तो पावसाचं पाणी साठवण्याचं मॉडेल बनवेल. स्पर्धेच्या दिवशी सगळे मुलं आपल्या प्रोजेक्टची तयारी करण्यात व्यस्त होते.
1 Best Marathi Moral Story For Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा
अनपेक्षित अडचण
पण त्याच्या आधीच्या रात्री अचानक सोहमच्या घरात वीज गेली आणि त्याचं मॉडेल अपूर्ण राहिलं. त्याला ते पूर्ण करता आले नाही. सोहमला काही कळेना की आता प्रोजेक्ट कसा पूर्ण करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं सोहम? तुझा चेहरा एवढा उतरलेला का? आरवने विचारलं.
सोहम म्हणाला, काल माझ्या घरी वीज गेली म्हणून माझं मॉडेल पूर्णच झालं नाही रे. आता स्पर्धेत कसा भाग घेणार? मी भाग घेऊ शकणार नाही. आरवने थोडा विचार केला आणि म्हणाला, चल, माझ्याकडे ये. आपण तुझं मॉडेल पूर्ण करूया. माझं तयार आहे आधीच.
1 Best Marathi Moral Story For Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा
खरी मैत्रीची कसोटी
सोहम म्हणाला, पण वेळ नाही, आणि तुझं काय? आरव हसत म्हणाला, मित्रासाठी वेळ काढायला काय हरकत आहे! दोघांनी मिळून झटपट सोहमचं मॉडेल पूर्ण केलं आणि शाळेत घेऊन गेले. स्पर्धा सुरु झाली. सोहमचं मॉडेल पाहून सगळे शिक्षक खुश झाले. शेवटी निकाल लागला आणि सोहमला पहिला क्रमांक मिळाला. सोहम आनंदाने आरवकडे पाहत म्हणाला, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही रे, आपला आहे. आणि ती ट्रॉफी आरवच्या हातात ठेवली.
गावाची प्रेरणा बनलेले मित्र
शिक्षकांनी हसत म्हणालं, अगदी बरोबर, खरी मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं. त्या दिवसानंतर गावात सगळ्यांना त्या दोन मित्रांची गोष्ट माहिती झाली. लोक म्हणू लागले, ही खरी मैत्री आहे, जी स्वतःच्या यशापेक्षा दुसऱ्याचं सुख मोठं समजते. आरव आणि सोहमने त्यानंतरही अनेक स्पर्धा जिंकल्या, पण त्यांना सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला होता मैत्रीचा खरा अर्थ समजण्याचा.
1 Best Marathi Moral Story For Kids | मित्राचा खरा अर्थ एक प्रेरणादायी बालकथा
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
शिकवण
खरी मैत्री म्हणजे केवळ एकत्र खेळणं किंवा हसणं नव्हे, तर एकमेकांच्या कठीण वेळेला साथ देणं आणि दुसऱ्याच्या यशात आनंद मानणं हेच खरं मित्राचं काम आहे.