1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर ही मजेदार मराठी कथा आहे गणप्या आणि त्याच्या चतुर मांजराची. “गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर” ही कथा तुम्हाला हसवून सोडेल. वाचा ही हास्याने भरलेली Marathi Funny Story जी शेवटपर्यंत स्मित ठेवेल तुमच्या चेहऱ्यावर.

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

गावातला गणप्या हा नेहमी काही ना काही गोंधळ करून सगळ्यांना हसवायचा. गोंधळया गणप्या असं नावच त्याला पडलं. गणप्याचं आयुष्य म्हणजे “गोंधळ” या शब्दाचा सजीव अर्थच होता. एक दिवस त्याने ठरवलं की, आता गावातल्या लोकांसमोर मी माझं स्मार्टपण दाखवणार. एकदा बाजारातून जात असताना त्याची नजर एका मांजराकडे जाते तेव्हत्या तो ठरवतो की मांजर घेऊया.

मग काय गणप्याने बाजारातून एक मांजर आणलं. आणि गावातील सगळ्यांना त्याची मांजर बघायला बोलावलं. सगळी लोकं गणप्याची मांजर बघायला जमले . त्या सगळ्या लोकांना गणप्याने सांगितलं, ही माझी मांजर साधी मांजर नाही. मी तिला खूप ट्रेनिंग दिलंय. मी तिला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत.

माझी मांजर माझ्यासाठी चहा बनवते! गावातले लोक गणप्यावर हसू लागले. एकजण त्याला म्हणतो गणप्या तुझं काहीतरी वेगळच असतं. कुणी म्हणालं, गणप्या, तू पुन्हा काहीतरी खुळं करत आहेस! पण गणप्याने ठरवलं होतं की सगळ्यांना दाखवायचं , त्याची मांजर जगातली सगळ्यात स्मार्ट मांजर आहे.

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

स्मार्ट मांजराचं डेमो

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे शेजारील लोक त्याच्या घरी जमले. आणि त्याला म्हटले की दाखव तुझी मांजर कशी चहा बनवते. गणप्या म्हणतो हो बघाच आता. मग काय.. झालं गणप्याचं काम सुरू. गणप्याने टेबलावर कप ठेवला, आणि मांजराकडे बोट दाखवत म्हणाला, चल बाई, चहा बनव! मांजर शांत बसली. गणप्या तिला पुन्हा म्हणाला, चल, काय पाहतेस? कामाला लाग!

मांजर म्याव म्हणाली आणि धावत स्वयंपाकघरात गेली. सगळ्यांचे डोळे विस्फारले. गणप्या खुश झाला. थोड्या वेळाने मांजर परत आली पण तिच्या तोंडात चहाची पिशवी, कपात चहा नाही! सगळे हसून लोळले. गणप्या म्हणाला, अगं पण मी सांगितलं होतं ना चहा बनवायला, आणायला नाही! मांजर पुन्हा म्याव म्हणाली आणि झाडावर चढली.

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

अजून येथे वाचा

गणप्याचा आणखी गोंधळ

गणप्या हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने ठरवलं, आज काही झालं तरी मी ह्या मांजरीकडून मोठं काम करवून घेणार! त्याने तिला दूध आणायला पाठवलं. मांजर गेली… पण परत आली नाही. संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिला पण ती काय आलीच नाही. गणप्या गावभर शोधायला निघाला. काही अंतरावर गेल्यावर त्याला ती मांजर दिसली. ती एका झाडाखाली बसलेली होती , आणि तिच्या आजूबाजूला अजून दहा मांजरी होत्या.

गणप्या जोरात ओरडला, अगं! मी तुला दूध आणायला पाठवलं होतं, आणि तू इथे पार्टी करतेस? ते बघून गावातले लोक पुन्हा हसून बेहाल झाले. कोणीतरी म्हणालं, अरे गणप्या, तुझी मांजर तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे. तिने काम टाळून पार्टी केली! गणप्या थोडा विचारात पडला आणि म्हणाला, होय खरच , आता मला समजलं की ट्रेनिंग मी नाही दिलं तिला, तीच मला ट्रेनिंग देतेय!

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

शेवट गोंधळ पण आनंदात

त्या दिवसानंतर गणप्याने मांजरचं नाव ठेवलं “मॅडम”. तो सगळ्यांना म्हणायचा, माझी मॅडम काही साधी नाही, ती मला रोज एक धडा शिकवते ” गोंधळातही आनंद कसा घ्यायचा ” हे मला तिच्याकडून कळलं. गावातला प्रत्येक दिवस मग गणप्या आणि मॅडमच्या गमतीजमतींनी गाजायला लागला. सगळ्यांना हसू, गणप्याला प्रसिद्धी, आणि मॅडमला दूध सगळं जिंकलं त्या जोडीने!

Watch More On

1 Best Marathi Comedy Story | एक भन्नाट मराठी Funny Story गोंधळ्या गणप्या आणि स्मार्ट मांजर

शिकवण

जीवनात थोडा गोंधळ असणं काही वाईट नाही. कधी कधी तोच गोंधळ आपल्याला हसवायला आणि जगायला शिकवतो.

Leave a Comment